भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील ग्राम माटोरा येथील जिल्हा परिषद शाळेत फक्त दोनच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याकरीता शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांना अनेकदा शासनाला निवेदन दिले मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर आज दि.८ जुलै रोजी समस्त माटोरा वासीयांना भंडारा पंचायत समितीला घेराव करीत शिक्षकांची नेमणुक करण्याची मागणी केली.यावेळी उपस्थित पंचायत समिती सभापती रत्नमाला चेटुले व गटशिक्षणाधिकारी श्री.राठोड यांनी गावकºयांशी चर्चा करून येत्या २० ते २५ जुलै पर्यंत शाळेमध्ये शिक्षकाची नेमुणक करण्याचे आश्वासन दिले.
आजच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत सरकारी मराठी माध्यमांच्या शाळा टिकविण्याचे मोठे आवाहन शासनापुढे उभे ठाकले आहे. एकीकडे शासन सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना राबवित आहे.मात्र दुसरीकडे सरकारी शाळांमध्ये आवश्यक शिक्षकांच्या संख्या व प्रत्यक्षात असलेल्यो शिक्षकांची संख्या यामध्ये मोठी तफावत दिसुन येते.जिल्ह्यात तर शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न मागील अनेक वर्षापासुन रेंगाळतच आहे.मागील अनेक वर्षापासुन न झालेली शिक्षक भरती व शिक्षकांची सेवानिवृत्ती याचे कुठेही तालमेल नसल्याने जिल्ह्यात सरकारी शाळा मोडकळीसआल्याचे चित्र आहे.आणि यातुनच सरकारी शाळांतील रोडावत चाललेली विद्यार्थी संख्या व विद्यार्थी नसल्याने बंद होणाºया सरकारी शाळा असे विदारक चित्र सध्या दिसुन येत आहे.
“शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात मोठी अडचण भासत आहे.याच कारणाने यावर्षी २० पालकांनी त्यांच्या मुलांचे नाव शाळेतुन कमी केले आहे.तर आणखी २० पालकांनी मुलांना शाळेतुन काढण्याकरीता अर्ज केला आहे.शाळेमध्ये शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही अनेकदा निवेदन दिले मात्र त्याचा कुठेही विचार करण्यात आला नाही.त्यामुळे अखेर गावकºयांसह आज आम्ही भंडारा पंचायत समितीला धडक दिली आहे.येत्या २०-२२ तारखेपर्यंत माटोरा येथील जि.प.शाळेमध्ये शिक्षक नियुक्तीचे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे.आश्वासनाची पुर्तता न झाल्यास संपुर्ण गावकºयांसह आमरण उपोषण करण्यात येईल.”
संदिप शेंडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,माटोरा.
“आमच्या शाळेमध्ये पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्या फारच कमी आहे.ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण योग्यरित्या होत नाही.याविषयी गावकºयांचा रोष ग्राम पंचायत व शाळा व्यवस्थापन समितीवर दिसुन येत आहे.आम्ही यासंदर्भात शासनाकडे अनेकदा निवेदनातुन शिक्षकाची मागणी केली मात्र त्याचा काही एक उपयोग झालेला नाही.अखेर आज गावकºयांसह भंडारा पंचायत समितीला धडक दिली असता येथेसुध्दा संबंधीत अधिकारी व पदाधिकारी यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत येत्या २०-२२ जुलै पर्यंत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे.आश्वासन न पाळल्यास प्रशासनाला गावकºयांच्या रोषाला समोर जावे लागेल.”
किशोर निंबार्ते सरपंच,माटोरा
“ग्राम माटोरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरीब,मजुर, शेतकरी यांची मुले शिक्षण घेतात. त्यांनासुध्दा योग्य शिक्षण मिळावे अशी गावकºयांची इच्छा आहे. मात्र शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याची शासनाने गांभिर्याने दखल घेवुन माटोरा जि.प.शाळेत आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करावी.”
हितेश सेलोकर ग्रामस्थ,माटोरा.