श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले असून चार जण जमखी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अद्यापही लष्काराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाºयांनी दिली आहे. कठुआ जिल्ह्यातील मचेडी भागात हा हल्ला झाला आहे. सायंकाळी दहशतवाद्यांनी एका टेकडीवरून अचानक लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला. तसेच हातगोळेही फेकले. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले, तर चार जवान जखमी झाले.