राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नविन पुर्णाकृती पुतळा बसवा

भंडारा : शहरातील मुख्य चौक समजला जाणारा व भंडारा शहराची आण, बाण म्हणुन मागील काळापासुन प्रख्यात असलेला एकमेव चौक म्हणुन गांधी चौक प्रसिद्धिच्या झोतात असुन या चौकात अनेक वर्षापासुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुर्णाकृती पुतळा या चौकात मोठ्या डौलाने उभा आहे. परंतु सध्यस्थितीत राष्ट्रपित्याचा हा पुतळा जिर्ण अवस्थेत आला असुन या जागेवर नविन पुर्णाकृती पुतळ्याची नितांत गरज आहे. हा पुतळा शहरातील नगर परिषदेच्या अगदी समोर उभा असुन नगर परिषद या पुतळ्याची पाहिजे ती दखल घेत नाही. आताच दोन ते तिन दिवसा अगोदर एका मानसिक रोग्याने महात्मा गांधी याच्या पुतळ्याच्या चबुतयावर चढुन गांधीजींच्या हातातली काठी ओढतान करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तेथील सजग नागरिक व पोलिसांच्या सहकार्याने त्या मानसिक रोग्याला तात्काळ पकडुन अनुचित प्रकार टाळण्यात आला.

मुख्य म्हणजे हा पुतळा आकारने लहान असुन याच्या चबुतºयावर कुणालाही पटकन चढता येऊन अनुचित प्रकार घडवुन आणता येतो. असे दृष्यकृत्य टाळण्याकरिता या पुतळ्याचे नुतनिकरण करणे गरजेचे आहे. करिता भंडारा शहर काँग्रेस कमीटिचे अध्यक्ष प्रशांत देशकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सांस्कृतिक विभागाचे चे सरचिटणीस महेंद्र वाहाणे, जिल्हा महासचिव सोहेल अहमद, लियाकत खान, नरेंद्र साकुरे, राजविलास बोरकर, किशोर राऊत, मुस्ताक शेख, सुभम बोरकर, मेहमुदभाई खान, आणि इतर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी आशा पठान यांना निवेदनामार्फत नविन पुणार्कृती पुतळ्याची मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *