जिल्ह्यातील सीबीएसई शाळांकडून एनसीईआरटीचे नियम धाब्यावर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भारत सरकारच्या मानव संसाधन विकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार देशातील सीबीएसई, आयसीएसई व अन्य शिक्षण मंडळांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये नॅशनल काऊन्सिल आॅफ एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) आखलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पाठ्यपुस्तके वापरणे बंधनकारक आहे. परंतु भंडारा जिल्ह्यातील सर्व सीबीएसई, आयसीएसई शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांबाबत एनसीईआरटीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण मंडळाकडून एनसीईआरटीच्या पुस्तकांऐवजी खासगी प्रकाशकांनी छापलेली महागडी पुस्तके घेण्यासाठी पालकांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना नाहक भूर्दंड सोसावा लागत आहे. सीबीएसई, आयसीएसई व राज्य शिक्षण मंडळांना एनसीईआरटीने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पाठ्यक्रमाची पुस्तके वापरणे मानव संसाधन विकास विभागाने बंधनकारक केले आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील एकाही सीबीएसई व आयसीएसई मंडळाची मान्यता असलेल्या शाळ- ांकडून एनसीईआरटीची पाठ्य पुस्तकांबाबतची मार्गदर्शक तत्वे पाळण्यात येत नाहीत. एनसीईआ- रटीची पुस्तके देण्याऐवजी शाळांकडून पालकांना खासगी प्रकाशकांची पुस्तके घेण्यास सीबीएसईच्या शाळांकडून सांगण्यात येते.

खासगी प्रकाशकांकडील १० ते १२ पुस्तकांच्या सेटसाठी पालकांना जवळपास पाच ते सात हजार रुपये मोजावे लागतात. तर एनसीईआरटीच्या पुस्तकांचा सेट ५०० ते ८०० रुपयांना मिळतो. त्यामुळे सीबीएसईच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाच ते सहा पट अधिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याची माहिती काही पालकांकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके वापरण्याबाबत शिक्षण विभागाने सर्व शाळांना आदेश देणे आवश्यक आहे. जर शाळा आदेशाचे पालन करत नसल्यास अश्या शाळांच्या नियमानुसार मान्यता रद्द करण्याची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम यांनी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे यांना जिल्हापरिषद भंडारा येथे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेनेचे शाखा प्रमुख रोशन ढोके, ईशान शेंदरे, धर्मशील रंगारी, योगेश चिंधालोरे, निखिल बिसेन, प्रविण गायधने सह पालक वर्ग उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *