‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ आढावा; १८ हजार अर्ज प्राप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेचा जिल्हास्तरीय आढावा आज घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसुंगे, यांच्यासह सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी आॅनलाईन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी शासनाने दिलेल्या सुधारित सूचनानुसार लाभार्थ्यांकडून आॅनलाईन तसेच आॅफलाईन अर्ज आवश्यक केला आहे. त्यासाठी कोणताही अ‍ॅनरॉईड मोबाईलवर नारी शक्ती दूत अ‍ॅप सहजरित्या डाउनलोड केल्या जाते. यावर आपला अर्ज दाखल करावा. आॅनलाईन अजार्मुळे मध्यस्थांकडून पैशांची मागणी होणार नाही व कोणतीही फसवणूक होणार नाही. शहरी भागांमध्ये मुख्याधिकाºयांनी प्रभागात जाऊन या योजनेबाबत माहिती द्यावी, तसेच कर संकलकांना हे काम द्यावे. उमेद व जीवनोन्नती कार्यक्रमातील कर्मचाºयांनी महिला संबंधित काम असल्याने त्या यंत्रणांना कार्यरत करावे. रोज दाखल झालेल्या आॅनलाईन आणि आॅफलाईन अर्जाची माहिती जिल्हाधिकाºयांना सादर करावी. कालपर्यंत एकूण १८ हजार ४७२ अर्ज प्राप्त झाले.

गाव पातळीवर चावडीवाचन कार्यक्रम घ्यावा, चावडी वाचनातील आलेल्या आक्षेपाचे निराकरण करण्यात यावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुर्तकोटी यांनी सांगितले. आधार कार्डवरचे नाव जसेचे तसेच अर्जावर लिहिण्यात यावे.त्यामध्ये टंकलेखनाची चूक करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. तहसीलदार महिला व बालविकास विभागाचे अधिकारीआणि गटविकास अधिकाºयांनी वेळोवेळी सेतू केंद्र तसेच त्यांच्या अधिनस्त ठिकाणी सुरू असलेल्या अर्ज वितरणाच्या व अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी भेटी देऊन परिस्थिती जाणून घ्यावी. शासकीय योजनेतून आधीच लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही. योजनेची अर्ज विक्री केंद्र वेळेत सुरू करावी. महिलांना अर्ज भरण्यात येणारे अडचणींविषयी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात यावे, आदी सूचना जिल्हाधिकारी महोदयांनी केल्या. यासंदर्भातील सर्व यंत्रणेतील अंगणवाडी सेविकेजवळ, नगर पालिकेमध्ये शहरासाठी प्रभाग कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *