भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : शहरातील सुभाष वार्डातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच वार्डात राहणाºया एका ३२ वर्षीय आरोपीविरोधात तिरोडा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता चे दरम्यान पीडित मुलगी हि तिच्या मैत्रिणीसह घरापासून काही अंतरावरील अन्य एका मैत्रिणीकडून नोटबुक आणण्याकरीता जात असता आरोपी महेश भोलाराम मखे ३२ वर्ष याने त्यांचा पाठलाग करीत पिडीतेच्या अंगाला चुकीच्या पध्दतीने स्पर्श करून तिचा विनयभंग केला. सदर घटना पीडित मुलीने तिच्या घरच्या मंडळींना सांग्ीतली असता पिडीत मुलीचे नातेवाईकांनी तिरोडा पोलीस स्टेशन येथे आरोपीविरोधात तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरोधात कलम ७४ ,७५ (१) ,७८ बी. एन. एस. सहकलम बालकांचे लैगीक अत्त्याचारा पासून संरक्षण अधिनियम कलम ८ ,१२ नुसार गुन्हा नोंद करून उपविभागीय अधिकारी साहिल झरकर, पोलीस निरीक्षक मिलिंद वानखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर करीत आहेत.