भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हयात पावसाने दडी मारल्याने धान नर्सरी नष्ट होण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतक-यांचे हीत जोपासून तत्काळ सर्वच उपसा सिंचनाचे पाणी सोडावे अन्यथा शासन व प्रशासनाच्या विरोधात शेतक-यांच्या हितासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने उपोषण करण्याचा इशारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेश डाहारे, उपजिल्हाप्रमुख दिपक गजभिये यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी नरेश डाहारे, दिपक गजभिये, देवेन्द्र कारेमोरे, नत्थु बांते, गजानन कळंबे, रामलाल बावणकर, गुरूदेव लिचडे, ताराचंद भुरे, सुभाष वाघमारे, गोपाल हटवार, राधेश्याम बांगडकर, केवल फंदे, गुड्डू सार्वे, चेतन राघोर्ते, संजय मडावी, अरवींद पडोळे, सुयोग धाबेकर, नाना केवट आदी उपस्थित होते