मुंढरी – करडी मार्गाचे काम संथगतीने सुरू

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मुंढरी ते करडी मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्या मार्गाने जाण्याच्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गाच्या काम अति वेगाने करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी भंडाराचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे. मुंढरी ते करडी या दरम्यान रस्त्याच्या अंतर साधारणता तीन किलोमीटर आहे. एक वर्षापासून या कामाला सुरुवात झाली. या मार्गाचे काम मजबुतीकरण व डांबरीकरणाचे होत आहे. तथापि, या मार्गाचे काम संपता संपेना. या मार्गावर पूर्ण रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. या मार्गाने जाताना चिखलातून मार्ग काढावा लागतो. या मार्गाने जाणाºया येणाºयांना मनस्ताप सहन करावा लागतो. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या मार्गाचे काम कधी होईल याच्या अंदाज दिसून येत नाही. या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे.

नागरिकांचे हाल होत आहेत. हा रस्ता अपघाताची वाट पाहत आहे काय असा सवाल जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी केला आहे. तोंडी सूचना देऊ नये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतांचे या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाकडे अजिबात लक्ष नाही. त्या मार्गाचे काम अति जलद गतीने करण्यात यावे अशी मागणी त्यांनी कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन केली आहे. या मागार्चे काम अति जलद गतीने गतीने करण्यात यावे. व ते काम लवकरात लवकर संपवून नागरिकांची हाल अपेष्टा थांबवावी. काम असे संत गतीने सुरू राहिले तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी निवेदनातून दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *