उज्वल मेश्राम हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज यादव, शाहरूख पठाण यांनाही अटक करा – मंजु मेश्राम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- भीमनगर येथे १८ जून २०२४ ला अल्पवयीन १७ वर्षीय उज्जवल मेश्राम याची कुरतेने हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आरोपी अदयाप ही तपासातून बाहेर आहेत. या प्रकरणात कल्लू यादव याला अटक केल्यानंतर याकरिता आदड आटप करणारे त्याचे मोठे बंधु गाँदिया जिल्हा शिवसेना प्रमुख पंकज यादव आणि शिवसेना अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष शाहरूख पठाण हे दोघे ही उज्जवल मेश्राम हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असून या दोघांना पण पोलिसांनी अटक करावी आणि या उज्जवल मेश्राम हत्याकांडाची सी. आय.डी. चौकशी करावी अशी मागणारी उज्जवल मेश्राम याची आई मंजू मेश्राम यांनी गुरुवार ११ जुलै रोजी गोंदियातील शासकिय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रपरिषदे तून केली आहे.

पत्रपरिषदेला मृतक उज्जवल मेश्राम ची आई मंजू मेश्राम, दिशा बंसोड, ममत मेश्राम, अनिता बनसोड, सुस्मिता बनसोड, श्रद्धा मेश्राम, वैशाली गजभिये, निशांत मेश्राम, राजू राहुलकर. आदि उपस्थित होते. पुढे गोंदिया शहर पोलिस उपनिरीक्षक विजय गराड यांच्यावर आरोप करीत मृत्तक उज्जवल मेश्रामची आई मंजु मेश्राम म्हणाली की, ११ जाने. २०२४ ला गोंदियातील हेम् कालोनी चौकात कललु यादव यांच्यावर झालेया गोळीबार कांडानंतर या प्रकरणातील प्रशांत मेश्राम याची माहिती देण्याकरिता उज्जवल मेश्रामयाला गोंदिया शहर पोलिस रात्र बेरात्री त्याला बोलावून माझया अल्पवयीन १७ वर्षीय मुलाला मारहाण करीत होते. व त्याला खूपच मानसिक रित्या त्रास देत होते.

आम्ही जेव्हा याचा जाब विचारलातेव्हा गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गराड यांनी आम्हाला १ लाख रुपये ची मागणी या प्रकरणातून उज्जवल मेश्राम ची सुटका करण्याकरिता मांगितले होते. व मी मंजु मेश्राम नी आपल्या घरातील आय फोन ची विक्री करून आपल्या मुलाला त्रास न देण्याक रिता सहायक पोलिस निरीक्षक विजय गराड याला आमच्या ओळखीची भीमनगर रहिवासी गौतम डोंगरे च्या माध्यमातून एक लाख विजय गराड याला दिले असल्याचे ही पत्रपरिषदेतून सांगितले. तसेच त्यांनी दोन दिवसां पूवी कल्लू यादव याच्या पत्नी स्वाती यादव यांनी या प्रकरणातील भीमनगर रहिवासी गोल यादव यांच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे पत्रपरिषदेतून सांगितले होते. पण असे काहीही नाही आहे. स्वाती यादव यांची काकेबहिण ही गोलू यादव यांच्याशी लग्न झालेला आहे. तसेच नात्यात गोलू यादव याचे पंकज यादव, कल्लू यादव व राकेश यादव है मामे लागतात. मागे असेच एक प्रकरण भीमनगर येथे घडले होते.

त्या वेळी गोलू यादव याच भीमनगर येथील दिवाकर झोलबाजी घरडे यांच्याशी भांडण झालेले असताना यादव चौकातील संपूर्ण यादव आणि विशेषत: पंकज यादव, कल्लू यादव, राकेश यादव आणि इतर यादव त्या दिवाकर घरडे च्या घरावर शस्त्रे, चाकू, जुती घेवून हल्ला केला होता. त्या रात्री संपूर्ण घरई कुटुंब आपले जीव मुठीत घेवून रात्र काढली होती. या प्रकरणातील यांचे गोलू यादव यांच्याशी असलेले संबध जाहीर होत असल्याचे मंजु मेश्राम यांनी सांगितले. तसंच आता कल्लू यादव यांच्या अटकेन तर आम्हाला दररोज नवनविन मोबाइल नंबर वरून आम्हाला संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसंच आमच्या कुटुंबातील जीवत जाळून गोंदिया जिल्हयात दुसरा प्रेरलाजी कांड घडविण्याचे मंसूबे यादव कुर्दियाकडून होत असल्याचा ही आरोप मृतक उज्जवल मेश्राम याची आई मंजू मेश्राम यानी लावला आहे. तसेच या प्रकरणाची सी. आय. डी. चौकशी करण्याची मागणी करण्यात आलो असून याकरिता आम्ही सह कुटुंब गोंदिया जिल्हाधिकारी यांत निबेदन सादर करणार असल्याचेही त्यानी पत्रपरिषदेतून सांगीतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *