भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- भंडारा-गोंदिया लोकभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी त्यांच्या दैनंदिन दौºया दरम्यान मोहाडी तालुक्यातील ग्राम रोहा येथील ग्राम पंचायत कार्यालय व जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेला भेट देत चर्चा केली. खा. पडोळे यांनी ग्राम पंचायत कार्यालयाला भेट देत ग्राम पंचायतचे पदाधिकारी तथा गावकरी यांच्याशी गावातील समस्याविषयी चर्चा केली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगुज करीत मुख्याध्यापकाकडुन विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया पोषण आहाराची माहिती जाणुन घेतली.
यावेळी खादार पडोळे यांनी स्वत: विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी कॉंग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रमोद तितीरमारे, मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार, जि.प सदस्य देवेंद इलमे जि.प.सभापती रमेश पारधी, शाळेच्या मुख्याध्यापीका माधवीताई नंदनवार, नरेंद्र मिश्रा, गणेश आगाशे, अशोक गाढवे तसेच महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकरी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख यांच्यासह ग्रामवासी उपस्थित होते.