भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आदिवासी क्षेत्रातील प्रस्तावित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खा.पटेलांकडे केली होती. त्यानुरूप अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा.प्रफुल पटेल यांनी वित्त मंत्रालय व आदिवासी विकास मंत्रालयाशी पाठपुरावा करून विकासकामे मंजूर करवून घेतली आहेत. यासाठी शासनाने १३.०० कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील रस्ता दर्जोन्नतीचे कामे होणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात विकासकामांवर भर देणे, क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा व दळणवळणाची सोय उपलब्ध करून देणे यासाठी खा.प्रफुल पटेल हे आग्रही राहिले आहेत. या संदर्भात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी ही बाब खा.प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच प्रस्ताविक असलेल्या विकासकामांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्धकरवून द्यावा, अशी विनंती केली.
आदिवासी क्षेत्राच्या विकासावर भर देण्यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला. त्यातच अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे वित्त मंत्रालय व आदिवासी विकास मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली. दरम्यान मंत्रालयीन स्तरावर करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील रस्ता दर्जोन्नतीच्या विकासकामांसाठी १३.०० कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. मंजूर झालेल्या निधीतून करण्यात येणाºया विकासकामांमध्ये गायमुख – सोनपुरी, सोरना लंजेरा, पिटेसूर -सोरना, नाकाडोंगरी -चिखला पाथरी, राजापूर – चिखला दफाई, बालापूर – पवनारखारी या रस्ता बांधकामाचा समावेश आहे. या निधीतून रस्ता दर्जोन्नतीची कामे करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी बहुल क्षेत्रातील नागरिकांच्या दळणवळण विषयक समस्या मार्गी लागून दिलासा मिळणार, असे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केले आहे.