भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : पावसाळा सुरू होऊन जवळ-जवळ दिड महिना लोटला गेला. काही प्रमाणात पावसाचे आगमन झाल्याने भंडारा तालुक्यातील सिल्ली परिसरात १०० टक्के धानाचे पºर्हे लागवड झाली. मात्र पºर्हे टाकून झाल्यावर अनेक दिवसांपासून पावसाने डोळे लावल्यामुळे बळीराजाची नजर दमदार पावसासाठी आकाशाकडे लागल्याचे दिसून येते. जून महिना कोरडा गेल्याने जुलै महिनाही कोरडा जाणार काय? या विचारात शेतकरी असतानाच जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल व जून महिन्याची भरपाई भरून काढेल असा हवामान खाते वृत्तपत्रातील बातम्यांमुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. चार दिवसांपासून ढगांनी केलेल्या गर्दीमुळे बळीराजामध्ये आनंद संचारला होता. मात्र तोही आनंद आता चेहºयावरून उतरला गेला. यावर्षी ईतर पिकाला फाटा देत परिसरातील शेतकºयांनी धान पिकाची जास्त प्रमाणात लागवड केली. जून महिन्याच्या शेवटी शेवटी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धान पिकाच्या नर्सºया अंकुरल्या गेले. परंतु, आता पाऊस बेपत्ता झाल्याने ते पºर्हे आता सुकल्या सारखे दिसत आहे. काही शेतकºर्यांचे पीक अजुनही जमिनीतच असल्याचे शेतकरी सांगत आहे. गेल्या वर्षी परिसरात मोठया प्रमाणात धान पिक घेण्यात आले. मात्र आस्मानी व सुल्तानी संकटाच्या वेढ्यात शेतकºयांना कवडीमोल प्रमाणात उत्पन्न झाले. तरी कोणतीही चिंता न करता छातीला माती लावून खाजगी सावकाराचे कर्ज काढून यावर्षीही शुतकरी जोमात धन लागवडीच्या कामाला लागला.
कारण वर्षभराच्या संसाराचा गाडा केवळ शेतीवरच अवलंबून असल्याने हे करावेच लागले, शासनाने खाजगी सावकाराचे धोरण बंद केले असले, तरी ग्रामीण भागात मोठया प्रमाणात खाजगी सावकाराचे जाळे दिसून येते. याकडे संबंधीत विभाग लक्ष देतील की नाही? हा मोठा प्रश्न आहे. काही शेतकºयांनी दागिणे गहाण करून पैसा आणून शेती पेरली आणि शेतीतील उत्पन्न निघाले की ज्यादा भावाने सोडवून आणतात. हे विदारक परिस्थिती ग्रामीण भागात आहे. एकीकडे पावसाने डोळेलावून असले, तरी ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे. ते शेतकरी बोअरवेल व विहीरीचे पाणी पिकाला देऊ शकतात परंतु शेतातील वीजही बेपत्ता असल्याने ते पाणी देणेही शक्य नसल्याचे दिसते. एकंदरीत पावसाअभावी तालुक्यात सर्वत्र कामे खोळंबून असल्याचे चित्र असून येत्या आठ दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली नाही तर वाटोळे होईल यात शंका नाही.