भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात तुमसर येथील जयप्रकाश यार्ड बाजार समितीमध्ये अन्नधान्यची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल होते. तथापि, या बाजार समितीमध्ये रात्री-अपरात्री शेतमाल घेऊन येणाºया शेतकºयांच्या निवासाची सोय होत नाही. याकरिता बाजार समितीच्या आवारात शेतकºयांसाठी मुक्कामाची सोय होण्याच्या दृष्टीने येथे किमान आवश्यक मूलभूत सोयीसाठी शेतकरी भवन उपलब्ध करून घ्यावे तसेच बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोर गरीब शेतकरी कामगार, हमाल, शेतमजूर यांच्यासाठी सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रावर १०० थाळ्या कमी पडत असून बाजारपेठेतील दृष्टीने येथे २०० थाळ्यांचा वाढीव इस्टांक मंजुरीसाठी शासनाकडे शिफारस करण्याची मागणी शेतकºयांच्या वतीने शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज विविध प्रकारचा शेतमाल व धान्यसाठा येत असतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकºयांसाठी “शेतकरी भवन” बांधकाम करण्यात यावे यासाठी खासदार म्हणून शासनाकडे पाठपुरावा करावा. तसेच बाजार समितीच्या आवारात येणाºया काळात विविध विकासात्मक कामे करण्यासंबंधी पुढाकार घ्यावा. “अ” वर्गात येत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत राबविल्या जाणाºया शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक शेतकºयांना मिळावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी मार्गदर्शन केंद्र, सल्ला केंद्र, प्रशिक्षण केंद्र इत्यादी सुविधा उपलब्धकरून घ्यावे अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम यांनी खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्याकडे केली. तसेच नवनिर्वाचित खासदार पडोळे यांच्या तुमसर येथील बाजार समितीच्या आवारात प्रथम आगमनानिमित्ताने शेतकºयांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती रामद्याल पारधी, जेष्ठ संचालक अरविंद कारेमोरे, समितीचे सचिव अनिल भोयर, संचालक राजेश पटले, हरेंद्र रहांगडाले, अशोक पटले, प्रमोद कटरे, गणेश बावणे, भोजराज वंजारी, शेखर सेलोकर, प्रमोद तितीरमरे, शैलेश पडोळे, धर्मशील रंगारी, रोशन ढोके, योगेश चिंधालोरे, दिलीप लांजेवार, हौशीलाल ठाकरे, अनिल रोकडे, गिरम ठाकरे, भुजबळ मेघरे, गोपीचंद राऊत, शामलाल अतकरी, विनोद कोकुडे, कुसुम कांबळे, प्रकाश भोयर, नरेश भोगे, हिरालाल रोडगे, विजय येरणे यासह शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.