भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शुक्रवार १२ जुलै रोजी खांबा जांभळी येथे विद्यृत शॉक लागून युवकाच्या मृत्यू प्रकरणी शनिवारी पोलीसांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला. व रविवारी ता. १४ ला साकोली पोलीस पथकाने गावात दूस-याही दिवशी हजेरी लावली. गावातील वातावरण निवारणासाठी पोलीसांनी गावकºयांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून ३ दिवसांचा पीसीआर घेण्यात आला. सध्या खरीप हंगामास सुरवात झाली असून, ठेकेदारी पद्धतीने शेती करण्यास घेतलेल्या एका शेतकºयानीजनावरांपासून ऊसाच्या पिकाची नासाडी होऊ नये याकरिता अवैधरित्या शेतात विद्युत करंट लावल्याने शनिवारी १२ जुलैला एका तरुणाचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना साकोली तालुक्यातील खांबा येथे घडली. शैलेश संजु रहांगडाले वय २९ असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे. या घटनेतील आरोपी नाजूक रघुनाथ रहांगडाले वय ५० यांनी गावातील पोलीस पाटील डोंगरे यांचे शेत ठेकेदारी पद्धतीने करावयास घेतले होते. शेतात उसाच्या पिकाला जनावरांपासून संरक्षण मिळावे आणि नासाडी होऊ नये याकरिता माहिती असताना देखील अवैधरित्या विद्युत करंट लावून ठेवले होते.
दरम्यान, या घटनेतील आरोपी क्रमांक दोन पियुष रहांगडाले वय १९ याने विद्युत करंटमुळे जीवितहानी होऊ शकतो याची माहिती असताना देखील स्वत: दूर परिसरात थांबून मृतकास शेतात पाठविले.त्यामुळे विद्युत करंट लागून शैलेश रहांगडालेयांचा दुदैर्वी मृत्यू झाला.मात्र, आरोपी क्र. २ ने घटनेची माहिती कुणालाही न देता पुरावा नष्ट व्हावा या हेतूने आरोपी क्रमांक एकला फक्त घटनेची महिती दिली.आणि शेतात जाऊन विद्युत आकोटे काढून दोन्ही आरोपीनी सांगणमत करून मृतकाचे प्रेत शेततळ्यात फेकून दिले. या घटनेतील मृतक याच्या वडिलांच्या फियार्दीवरून साकोली पोलीसांत विविध कलमान्व्य गुन्हा दाखल करण्यात आला असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक वानखेडे करीत आहेत.