सेवानिवृत्त कर्मचाºयाच्या भविष्य निर्वाह निधीवर ग्रामसेवकाचा डल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील वरठी ग्रामपंचात कार्यालयात काम करणाºया एका सेवानिवृत्त कर्मचाºयाच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम तेथील ग्रामसेवकाने लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुखदेव विठोबा मते असे पिडीत कर्मचाºयाचे नाव असून याप्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वरठी येथील हनुमान वॉर्ड मध्ये राहणारे सुखदेव विठोबा मते हे जवळपास दोन वर्षांपासून वरठी ग्रामपंचायत मध्ये नियमित कर्मचारी म्हणून नाली सफाई आणि पाईप लाईनचे काम करीत होते. ३० आॅक्टोबर रोजी ते सेवानिवृत्त झाले. सेवेत असताना त्याच्या पगारातून काही रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या स्वरूपात कपात होत असे त्यात सुखदेव यांच्या पगारातून १०९० रुपये कपात होत होते तर तेवढीच रक्कम अर्थात १०९० रुपये ग्राम पंचायतच्या वतीने त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होत असे. याशिवाय भविष्य निर्वाह निधीची रक्कम अधिक मिळावी या हेतूने सुखदेव त्यांच्या पगारातून अतिरिक्त १००० रुपये कपात केले जात होते. सन २०२० ते २२ असे दोन वर्ष मते यांच्या पगारातून दरमहा एकूण ३१८० रुपये कपात होत असत. ही सर्व रक्कम ग्रामपंचायत सचिव तथा ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्याकडे जमा राहत होते. आठ महिन्यांपूर्वी सुखदेव मते सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्त झाल्यानंतर सुखदेव त्यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेची मागणी ग्रामपंचायतकडे केली. यासाठी त्यांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाच्या चकरा मारल्या मात्र ८ महिने लोटूनही त्यांना त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळत नाही. अखेर त्यांनी याबाबत सखोल चौकशी केली असता धक्कादायक वास्तव त्यांच्यासमोर आले. त्यांना पगारातून कपात होत असलेल्या भविष्य निर्वाह निधीवर तेथील ग्रामसेवकांने डल्ला मारल्याचे त्यांना कळले. ग्रामसेवक दिगंबर गभने यांनी २०२१ ते २२ या वर्षभरातील मते यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलीच नसल्याची माहिती त्यांना मिळाली. जुलै २०२१ ते आॅक्टोबर २३ अशा १५ महिन्याचे ८९ हजार ४० रुपये अफरातफर करून ग्रामसेवक दिगंबर गभणे यांनी त्याच्या खिश्यात घातले असल्याचा आरोप मते यांनी केला आहे. गभने यांनी ही रक्कम कोणत्या शासकीय कामात खर्च केली किंवा वैयक्तिक लाभासाठी खर्च केली याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे मते यांनी तक्रारीत नमूद केले आहे. आपल्या भविष्य निर्वाह निधीवर ग्रामसेवकांनी डल्ला मारल्याची गंभीर बाब लक्षात येताच सेवानिवृत्त कर्मचारी मते यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम संबंधाने पोलीस स्टेशन वरठी येथे तक्रार दाखल केली असून ग्रामसेवक गभने यांची चौकशी करून भविष्य निर्वाह निधीची रक्कम ताबडतोब देण्यात यांनी अशी मागणी मते यांनी केली आहे.

याच अनुषंगाने वरठी येथील सामाजिक कार्यकर्ते अश्विन मधुकर शेंडे यांनी २६ जून २०२४ रोजी माहितीच्या अधिकारात माहिती मगविली होती.यात वरठी ग्रामपंचायत कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या २० कर्मचाºयांपैकी किती कर्मचाºयांच्या खात्यात आतापर्यंत भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात आला आहे, किती कर्मचाºयाना अद्याप मिळाला नाही, मिळाला नसल्यास त्याची कारणे काय अशी माहिती शेंडे यांनी माहितीच्या अधिकारात मागवली. ही माहिती पुरविण्याकरिता संकलित करण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही माहिती आपणास पुरविण्याकरिता संकलित करणे सुरु असून माहिती संकलित होताच आपणास माहितीच्या एकूण पृष्ठाची संख्या व त्याकरिता लागणारे एकुण शुल्क आपणास कळविण्यात येईल असे उत्तर जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी दिगंबर गभने यांनी दिली. या प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अश्विन शेंडे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *