‘लाडकी बहिण’योजनेच्या नावाने लुटमार-डॉ.हेमंत राहांगडाले

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : लाडकी बहिण योजनेच्या नावाने भंडारा जिल्हात जिथे तिथे दलालांची लुटमार सुरु आहे. मोबाईल अ‍ॅप च्या माध्यमातून चक्क दलाल मंडळी व महा-ई-सेवा केंद्रे तसेच शासनांच्या विविध केंद्रांवर दलालांची सक्रियता वाढलेली आहे. या योजनेच्या नावाने अल्प शिक्षित व ग्रामीण माहिलांची दिशाभूल करून दलाल मंडळी त्यांच्या कडून अतिरिक्त आर्थिक लुबाडणूक करीत आहेत. शासनांने या योजनेतील सुरवातीच्या काळातील अटी-शर्ती वगळून यात आता कोणतीही अट नाही असे स्पष्टपणे सांगितलेले आहे, तरी सुद्धा हे भामटे काही अल्प शिक्षित व ग्रामीण महिला भगिनीची दिशाभूल करून अनेक विना आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगतात आणि या कागदपत्रांची योग्य माहितीनसल्यामुळे ते या भामट्यांच्या जाळ्यात अडकतात. भंडारा जिल्हातील शहरी व ग्रामीण भागात एक अर्ज भरण्याकरिता महा-ई-सेवा केंद्रामध्ये १०० ते २००० रुपये पर्यंत पैसे घेण्यात येत आहेत, अशी तक्रार लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था जिल्हा प्रमुख डॉ.हेमंत राहांगडाले यांच्याकडे आली आहे.

प्राप्त तक्रारीनुसार, डॉ.हेमंत राहांगडाले यांनी याबद्दल वरिष्ठ विभागीय अधिकारी व प्रशासनाला कळवलेले आहे. तसेच या संदर्भात सर्व जिल्ह्यातील महिलावर्गांना हि महत्वाची सूचना देण्यात येत आहे कि, महाराष्ट्र शासनाने यायोजनेची अर्ज प्रकिया सामान्य महिलावर्गाकरीता सरळ व सोपी केलेली आहे. यात १ रुपये खर्च न करता आपल्या घरीच आपण हे अर्ज आँनलाईन पद्धतीने मराठी भाषेत भरू शकतो म्हणून कोणत्याही महा-ई-सेवा केंद्रावर अर्ज भरल्यास किवां अंगणवाडीला अर्ज भरल्यास १ रुपये देऊ नये, कारण या योजनांचे १ अर्ज आनलाईन भरण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून महा-ई-सेवा केंद्र आणि अंगणवाडी सेविकेला ५० रुपये देण्यात येत आहे. ज्यामुळे अर्जदारास १ रुपये सुद्धा देण्याची आवश्यकता नाही आणि जर आपल्याला कोणीही महा-ईसेवा केंद्रावर किंवा अंगणवाडी तसेच व्यक्तिगत भामटा पैश्याची मागणी करीत असेल तर जिल्हातील माता-भगिनींनी लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था जिल्हा प्रमुख डॉ.हेमंत राहांगडाले यांच्या जिल्हा कार्यालयाशी त्वरित ७७९८००७३५८ या क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहन डॉ.हेमंत राहांगडाले यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *