भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : स्थानिक अकॅडमिक हा- ईट्स पब्लिक स्कूल (एकोडी रोड ) साकोली येथे दि.१६ जुलै २०२४ शनिवारला अंलकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुशांतकुमार सिंग (आय.पि.एस.) एस.डि.पि.ओ. साकोली तर प्रमुख अतिथी म्हणुन शाळेचे संचालक डॉ.राजेश चंदवानी, सचिव डॉ. गिता चंदवानी समर्पन बहुउद्देशिय विकास संस्था साकोली,शाळा व्यवस्थापक जी.एच.ठाकरे,मुख्याध्यापिका डॉ . संचिता ब्रम्हचारी, एच.एम.रिना फ्रॅन्सिस, प्रा.अमितोज कौर प्रा.अतुल नंदेश्वर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता पूजनीय शारदा मातेच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पन करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना बदलत्या शिक्षण प्रणाली नुसार त्यांची जबाबदारी देवून मोटीवेटर,अचिवर,प्रोग्रेसर,इनोवेटर अशाप्रकारे प्रमुख प्रतिनिधित्व पद बहाल करून त्यांची कार्यप्रणाली सांगण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशांत कुमार सिंग एस.डी.पि.ओ साकोली ह्यानी विद्यार्थ्याची प्रशंसा करून शाळेतील शिस्त, आदरभाव आणि आदर्श विद्यार्थ्याचे गुण सर्व विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजेत असे आपल्या वक्तव्यात म्हटले.
मुख्याध्यापिका संचिता ब्रम्हचारी ह्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी धैर्य आणि चिकाटी ने नेमुन दिलेल्या कार्याचे प्रतिनिधित्व करावे आणि सामोरे जावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केतन हत्तीमारे,मनोजकुमार पेटकुले, शेहबाज खान,धनराज मेश्राम,सचिन मारवाडे, निखिल निबेंकर,मोहन रहीमतकर ,निशिकांत माटुरकर, सारीका ठाकरे,नंदा कापगते,मृणाली कोसे,श्रुणाली जंवजाळ ,शिरीन शेख, लता कटरे, शिवाली गुप्ता, दिक्षा गेडाम ,पुनम वाडीभस्मे, धामेंद वलथरे, नितु भोयर,पुष्पलता आसलवार, प्रिती धुर्वे,योगीता भेंडांरकर, विजया भेंडारकर,नेहा रुखमोडे, संगिता हुमणे,खुशबू कापगते तसेच सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिना फ्रॅन्सिस यांनी केले तर सूत्रसंचालन कु. हितिका चंदवानी,कविश लोहिया, कामरान अंसारी ह्यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.अमितोज कौर योनी केले.