दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- शिकवणी वर्ग आटपून घराकडे परत जाणाºया विद्यार्थ्याच्या सायकल ला मोटारसायकल ने धडक दिल्याची घटना शुक्रवारी (ता. १२) ला सकाळी १० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जि. प. गांधी विद्यालयासमोरील सर्विस रोडवर घडली. एकांत आशिष थानथराटे वय १४ रा समर्थ नगर लाखनी असे गंभीर जखमी विद्याथ्यार्चे नाव असून तो समर्थ विद्यालयाचा १० व्या वगार्चा विद्यार्थी आहे. त्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. एकांत हा दररोज नित्यनेमाने सकाळी ७ वाजता शिकवणी वर्गाकरिता जायचा तसेच शिकवणी वर्ग आटपून तो दररोज १० वाजता घरी यायचा शुक्रवारी (ता. १२) ला आपल्या दैनदिन कार्याप्रमाणे शिकवणी वर्ग आटपून घराकडे परत येत असताना भरधाव वेगाने जाणाºया दुचाकी (क्र एम एच ३६ ए ई ०२९५) च्या चालकाने एकांत च्या सायकल ला मागेहून धडक दिली.

यात एकांत च्या डोक्याला जब्बर मार लागला घटनास्थळावर उपस्थितांनी त्याला लगेच उचलून एका खाजगी रुग्णालयात नेले त्याच्यावर प्रथमोपचार करून प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला भंडारा येथे हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाºयांनी दिला. भंडारा येथून त्याला नागपूर येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असूनतिथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. घटनेची नोंद लाखनी पोलिसांनी केली असून दुचाकी चालकावर लाखनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. एकांतचे वडील अशोक लेलँड कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड असून, महिन्याला सुमारे विस हजार रुपये प्रति माह पगार कमवितात. एकांतला एका दिवसाला सुमारे २० ते २५ खर्च येत असून तो खर्च त्याच्या परिवाराला परवडणारा नसल्याने तसेच त्याच्या उपचारासाठी सुमारे १० ते १५ लक्ष रुपयाचा खर्च डॉक्टरांनी सांगितला आहे. तसेच एकांत हा एकुलता एक असून परिवाराची परिस्थिती बेताची आहे. तेव्हा त्याच्या उपचारासाठी सढळ हाताने मदत करावी अशी मागणी होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *