भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नियमानुसार सीबीएसई शाळ- ांमध्ये एनसीईआरटी अभ्यासक्रमातून शिकवणे बंधनकारक आहे. खाजगी प्रकाशनांनी प्रकाशित केलेली पुस्तके शाळांमध्ये शिकवणे किंवा विकणे हा कायदेशीर गुन्हा आहे. सीबीएसई शाळा स्वत:च्या फायद्यासाठी सरकारी नियम आणि कायद्यांचे खुलेआम उल्लंघन करत आहेत. तुमसर पालक संघटनेने शिक्षणाधिकारी भंडारा व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तुमसर यांच्याकडे शेकडो वेळा तक्रारी केल्या. मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. खासदार प्रशांत पडोळे निवडून आल्यानंतर प्रथमच तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत आले. यावेळी तुमसर पालक संघातर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सीबीएसई शाळांनी मनमानी पद्धतीने अनेक नियमांचे उल्लंघन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. २०१४, २०१६ आणि २०१८ मध्ये सुधारित केलेल्या महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियमन अधिनियम २०११ चे सर्रास उल्लंघन झाले आहे. नियमानुसार पीटीए स्थापन करण्याऐवजी शाळा नी मनमानी पद्धतीने पालकांकडून बेकायदेशीर फी वसूल करत आहे.
हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. यासाठी शाळा प्रशासनाला सहा महिन्यांचा कारावास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा आहें या मागणीबाबत तुमसर पालक संघटनेने खासदारांना निवेदन दिले आहे. की, जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची विशेष बैठक बोलावून पालकांना न्याय मिळवून द्यावा. निवेदन देताना तुमसर पालक संघटनेचे अनिल गभणे, आशिष कुकडे,योगेश रंगवाणी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शैलेश पडोळे, सचिन बडवाईक, डॉ. राद्रसेन भजनकर, विजय मालेवार, प्रमोद कात्रे, दिनेश ढोके, योगेश सोनकुसरे, नागेश्वर राऊत, कल्पना मलेवार, रिमा भजनकर, अमरीश जैस्वाल, मोहन मोहतुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.