रेशनकार्ड धारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मुंबई : तुम्हीही रेशनकार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी गुड न्युज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारक सर्व नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. आता गणेशोत्सवातही राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार गणेशोत्सवात ५६० कोटींचा आनंदाचा शिधा वाटणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार तब्बल १ कोटी ७० लाखांहून अधिक शिधापत्रिका धारकांना याचा लाभ मिळणार आहे. या वाटपासाठी निविदा प्रक्रिया २१ ऐवजी ८ दिवसांत पूर्ण करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा वाटप हा १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर २०२४ याकाळात होणार आहे. या शिध्याच्या प्रत्येक संच रुपए शंभरप्रमाणे सवलतीच्या दरात वितरीत केला जाणार आहे. यामध्ये प्रत्येकी १ किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *