भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचाºयांची कपात न करता लागू करण्यात यावा यासह एकूण १५ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून (दि.१५) – बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत येथील महसूल कर्मचारीही न आंदोलनात सहभागी झाले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन बसले आहेत. महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध कोणत्याही संवगार्तील कर्मचाºयांची कपात न करता लागू करण्यात यावा, अव्वल कारकुनमंडळ अधिकारी संवर्गातुन नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावे, महसूल विभागाचा आकृतीबंध तत्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणाºया महसूल कर्मचाºयांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे, वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तत्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, महसूल सहायकाचा ग्रेडपे १९०० वरून २४०० करण्यात यावा, महसूल सहायक व तलाठ्यांना सेवांतर्गत एकसमान परीक्षा पद्धत लागू करण्यात यावी,
महाराष्ट्र शासन वित्त विभागाची अधिसूचना दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ नुसार तत्काळ अव्वल कारकुनांची वेतन निश्चिती करण्यात यावी, महसूल सहायकाची सेवा ज्येष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम १९९९ मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावी, महसूल विभागातील अधिकारी कर्मचाºयांची सेवापुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथकाऐवजी समकक्ष असलेल्या महसूल विभागातील नियुक्त लेखाधिकाºयांच्या वेतन पडताळणी अधिकाºयामार्फत करण्यात यावी,अव्वल कारकून या संवर्गाचे पदनाम बदलून सहायक महसूल अधिकारी असे करण्यात यावे, नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड वेतन ४८०० करण्यात यावा, अव्वल कारकुनांना मंडळ अधिकारी पदावर अदला-बदली धोरणानुसार पदस्थापना देण्यात यावी, नायब तहसीलदार पदासाठी अव्वल कारकून-मंडळ अधिकाºयाांकरिता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळसेवा याबाबतचे प्रमाणे ७०:१०:२० असे करण्यात यावे, चतुर्थश्रेणी-शिपाई कर्मचाºयांना पदोन्नती देताना तलाठी संवर्गात २५% पदोन्नती देण्यात यावी तसेच कोतवाल पदांना चतुर्थश्रेणी ‘ड’ दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदोन्नती कोटा वाढविण्यात यावा, या मागण्यांसाठी महसूल कर्मचाºयांनी बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे.