भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : घरकुल लाभार्थ्यांना मोदी आवास योजने अंतर्गत निधि अजून पर्यंत प्राप्त झाला नसल्यामुळे लाभार्थी अडचणीत आलेले आहेत. त्यांना सात दिवसाचे आत निधी उपलब्ध करून देण्यात आले नाही तर २३ जुलै रोजी तुमसर बपेरा राज्य मार्गावर सिहोरा येथे रस्ता रोको आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा पंचायत समिती तुमसरचे उप सभापती हिरालाल नागपुरे यांनी प्रशासनाला एका प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. लाभार्थ्यांना मागील बºयाच दिवासापासुन मोदी आवास योजने अंतर्गत निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे.
आज पावसाळयाच्या दिवसातही त्यांना उघड्यावर वास्तव्य करण्याची वेळ आलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तुमसर तालुक्यात ४ कोटी ३९ लक्ष रुपया ऐवढा निधी मजुरांचा शासनाकडे अडून आहे. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने उपरोक्त निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, अन्यथा घरकुल लाभार्थी व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरांसह पंचायत समिती तुमसरचे उपसभापती हिरालाल नागपूरे २३3 जुलै रोजी सिहोरा येथील मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शासन व प्रशासनाला दिला आहे. निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी पंचायत समिती तुमसर यांचे मार्फत जिल्हाधिकारी भंडारा यांना पाठविण्यात आले आहे. आंदोलनाची भूमिका उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासनाला सुद्धा कळविण्यात आली आहे.