भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा/गोंदिया :- खा.प्रशांत पडोळे यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील सडक अर्जुनी तालुक्यातील धानोरी गावातील महेश कटरे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.यावेळी तेथील शेतकरी व शेतमतुरांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या.यावेळी खा.प्रशांत पडोळे यांनी स्वत:शेतात उतरून धान पीकांची रोवणी केली. दैनंदिन दौºयावर असता शेतकºयांच्या शेतावर जाऊन शेतकºयांच्या समस्या ऐकून घेतल्या.
सध्या पावसाळा सुरू असता शेतकºयांच्या भात पिकाला पाण्याची अत्यंत गरज आहे, भात पिकाची रोवणी सुरू आहे. अशातच काही महाराष्ट्र सरकारने विजेचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास शेतकºयांना देणे सुरू केले, किती त्रास सहन करावा लागत आहे, ना बरोबर १२ तास विज शेतकºयांना मिळत, हा मोठा प्रश्न शेतकºयांसमोर उभा नेहमीच असतो. दिवसा आणि रात्री पण विद्युत पुरवठा बरोबर होत नाही, शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकरी पिकला पाहिजे. शेतकºयांना सुगीचे दिवस आले पाहिजेत, यासाठी मी नेहमीच शेतकºयाांच्या पाठीशी आहे. शेतकरी नेहमीच महिला मंडळी सोबत शेतात राब-राब राबत असतात. शेतकºयांच्या शेतावर जाणारे रस्ते बरोबर नाहीत आजही चिखलातून जावे लागते. पायांना मोठया प्रमाणात काटे रुतलेले आहेत. किती वेदना शेतकºयांना आहेत. या महायुतीच्या सरकारला शेतकºयांच्या भावना समजणार नाहीत.सडक अर्जुनी तालुक्यात दैनंदिन दौरावर असता त्या दरम्यान धानोरी ता.सडक अजुर्नी येथे शेतकºयांच्या शेतात जाऊन भात पिकाची रोवणीची पाहणी केली, आणि स्वत: शेतातील काम करणाºया महिलांसोबत भात पिकाची रोवणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. प्रशांत पडोळे केली. सोबत दिलीप बन्सोड जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी गोंदिया, पदाधिकारी, कार्यकर्ते, धानोरी येथील शेतकरी उपस्थित होते.