मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा!

पंढरपूर : आज आषाढी एकादशीचा सोहळा असून जय हरी विठ्ठलाच्या गजराने संपूर्ण महाराष्ट्र भक्तीमय झाला आहे. यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय ५५ वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय ५० वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य गेल्या १६ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी, वडिल संभाजीराव शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘विठुरायाला चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे’ असे साकडे विठ्ठलाला घातले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *