भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा ते कारधा मार्गावरील प्रसिद्ध असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कारधा येथील साई मंदिराकडे जाणारा मुख्य मार्गावर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गाने प्रवास करणाºयांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे.खा.प्रशांत पडोळे यांनी आज या मार्गाची पाहणी करीत यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले. कारधा येथील साई मंदीर हे प्रख्यात असे मंदिर असुन या ठिकाणी भक्त नागरीकांची नेहमीच वर्दळ दिसुन येते.सध्या पावसाळा सुरू झाला असुन भंडारा इथुन साईमंदीरकडे जाणाºया एकमेव मुख्य मार्गावर मोठया प्रमाणात पाणी साचुन राहत असल्याने नागरीक व भाविकांना या मार्गाने प्रवास करतांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेष म्हणजे याच मार्गाने वैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरून हजारो नागरीक दररोज प्रवास करीत असतात. भंडारा शहरालगत बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीच्या सदोष बांधकामामुळे साई मंदीरकडे जाणाºया मार्गावर मोठया प्रमाणात पाणी साचुन राहत असल्याचे दिसुन येते.या साचलेल्या पाण्यामधुन मार्ग काढतांना पायी प्रवास करणातांना अनेक नागरीकांचा तोल जावुन ते पाण्यामध्ये पडल्याची माहिती असुन या पाण्यामधुन प्रवास करतांना अनेकांच्या दुचाक्यांमध्ये बिघाड होवुन त्यांना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
काही सजग नागरिकांनी सदर माहिती भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांना दिली असता खा. पडोळे यांनी भंडारा नगर परिषद सीओ करणकुमार चव्हाण यांना सोबत घेऊन तात्काळ कारधा साई मंदिर येथील रस्त्यावर साचलेल्या पाण्यास्थळी पाहचले.तिथे त्यांनी प्रत्यक्षात माहिती जाणुन घेत सदर समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश भंडारा नगर परिषद प्रशासनाला दिले. तसेच गोसे विभागाच्या अधिकºयांशी संपर्क साधुन अपुर्ण काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. खा.पडोळे यांनी यावेळी पाटबंधारे विभागाच्या लिμटची पाहणी केली. तसेच तलावाची साफ सफाई करून तात्काळ बुजलेल्या नाल्या खुल्या करण्याचे निर्देश गोसे विभागातील अधिकाºयांना दिले. तसेच वैनगंगा नदीपात्रात असलेल्या इकोर्निया वनस्पतीची तात्काळ विल्हेवाट लावण्याचे आदेशही खा.प्रशांत पडोळे यांनी यावेळी दिले.