भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरोली महागाव जवळ दुचाकी आणि स्कूल बसमध्ये अमोरा समोर भीषण अपघात झाल्याची गंभीर घटना आज ता. १८ जुलै रोजी सकाळी १०.१५ दरम्यान घडली. अर्जुनी मोरगाव येथे वीज वितरण विभगात कार्यरत हरिदास वासुदेव कोहरे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणारी त्यांची पत्नी हिराबाई कोहरे वय ४० या सुद्धा गंभीर असल्याची दुदैर्वी घटना समोर आली आहे. अपघात घडल्यानंतर अपघात स्थळी वीज वितरण विभागात कार्यरत कर्मचारी हरिदास कोहरे जमलेला जनतेचा जमाव महागाव येथील रहिवासी असलेले हरिदास कोहरे विद्युत वितरण पारेषण १३२ अर्जुनी मोरगाव येथे शासकीय सेवेत कार्यरत होते.
ते आपले रात्रपाळीतील सेवा पूर्ण करून राहते गांव महागाव हे मुख्यालया पासून जवळ असल्याने शेतात खरीप हंगामातील भात लागवडीकरीता मशागतीच्या कामाला मदत करण्यासाठी आपल्या पत्नीसह अर्जुनी मोरगाव वरून महागावकडे जात असताना राधिका पेट्रोल पंप सिरोलीच्या जवळ स्कूल बस क्रमांक एम.एच. ३५ एजे ३६३४ व त्यांच्यात अमोरासमोर धडक झाल्याने गंभीर अपघात घडला आणि या धडकेत दुचाकी चालक हरिदास कोहरे यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी ही गंभीर रित्या जखमी झाल्याची चर्चा प्रत्यकक्षदर्शी उपस्थित जमावामध्ये होती या घटनेचा तपास अर्जुनी पोलीस करत असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असुन मृतकाच्या पत्नीवर ग्रामीण रुग्णालय अजुर्नी मोरगाव येथे उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. तर पुढील तपास अर्जुनी मोरगाव करत आहे.