भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहराकरिता नवीन लँडमार्कची ओळख देणारे अशा खांबतलाव वरील ५१ फुटाच्या प्रभू श्री रामाच्या भव्य दिव्य मूर्तीचे निर्माण कार्य पूर्णत्वास येत असून आता श्री रामाच्या मूर्तीच्या स्थापनेची तैयारी करण्यात येत आहे. आज आम. नरेंद्र भोंडेकर यांनी या निर्माणकार्याची पाहणी करून लवकरात लवकर मूर्तीची स्थापना करण्याचे निर्देश दिले. जेणेकरून येत्या १५ आॅगष्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते याचे लोकार्पण करता येईल. आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या भंडारा विधानसभा क्षेत्रात विकास कार्यांचा सपाटा लावून या क्षेत्राचे नाव जागतिक स्तरावर नेण्याचे प्रण घेतले आहे.त्या करीता वैनगंगा नदीवर त्यांनी गोसेजलपर्यटण सारखा प्रकल्प हाती घेतला असून त्याचे भूमिपूजन नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पाडले. या विकास कामांमध्ये भंडार शहराकरीत माईल स्टोन ठरणार ते शहरातील खांबतलाव येथे स्थापित होणारी श्री रामाची ५१ फुटाची भव्य प्रतीमा. या प्रतिमेचे काम मुंबई येथील शिल्पकारच्याहस्ते घडवून आणले असून आता ही प्रतीम तुकड्यांमध्ये भंडारा येथे पोहोचण्यास तयार आहे. ज्या करिता तलावातील फाउंडेशन चे काम पूर्णत्वास आले आहे. जवळपास ४५ कोटींची लागत असलेल्या या प्रतिमेची लवकरात लवकर स्थापना करून येत्या १५ आॅगष्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रतिमेचे लोकार्पण केल्या जाईल.
भंडाराचे आराध्य मानले जाणारे बहिरंगेश्वर देवस्थान ज्या तलावाच्या पाळीवर वसलेले आहे त्या खांब तलावाला सुद्धा धार्मिक महत्व लाभले आहे. या मूर्तीस्थापणे नंतर भंडारा शहराला नवीन लँड मार्क मिळणार असून येथे असंख्य पर्यटकांच्या भेटी होतील. ज्यामुळे तलाव जवळील व्यवसायांना वाव मिळून नवीन रोजगरांची संधी उपलब्ध होणार आणि हजारो हातांना रोजगार मिळू शकेल. आम. भोंडेकर यांनी या तलावाचे कायापालट करून भंडाºयाला नवीन ओळख देण्याचे ठरविले. यात तलावाच्या पाळी पासून मूर्ती पर्यंत जाण्याकरिता पूल, तलावात बोटिंगची व्यवस्था, सोबतच तलावा भोवती सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या करीता गेल्या एक वर्षा पासून निर्माण कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. आम. भोंडेकर यांनी आज दुपारी या निर्माण कार्याची पाहणी केली. या वेळी त्यांच्या सोबत जिल्हा प्रमुख अनिल गायधने,उप जिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, शहर प्रमुख मनोज साकुरे, शिवसेना नेते संजय कुंभलकर, शहर संघटक नितीन धाकते, नितेश मोघरे, सतीश तुरकर, दिनेश गजभे व अन्य नेतागण उपस्थित होते.