कार्यकर्त्यांनी २० टक्क्याचे राजकारण व ८० टक्क्याचे समाजकारण करावे-आ. राजू कारेमोरे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समाजात वावरत असताना राजकारण २० टक्क्याचे करुन ८० टक्क्याचे समाजकारण करावे असे मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस आढावा सभेत दि. २२ जुलै २०२४ ला दुपारी ३वाजता परमपूज्य परमात्मा एक सांस्कृतिक भवन मोहाडी येथे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले कि आपण आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गोरगरीब, शेतकरी, रस्ते, पुलिया, रस्ते, विद्यार्थी, सिंचन अश्या अनेक योजनेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे. तसेच सर्व समाजाला सोबत घेऊन तुमसर-मोहाडी विधानसभेत विकास खेचून आणला आहे. भविष्यात सुद्धा आपण विकासाच्या कामाला प्राधान्य देणार आहोत, कोरोना काळात आपण आपली जबाबदारी समजून, आॅक्सिजनसिलेंडर, अन्नधान्य, औषधी, फळभाज्या, आर्थिक मदत गरजूंना केली आहे, असे बोलत होते.

आयोजित व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजू माणिकराव कारेमोरे हे होते तर तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, सभापती रितेश वासनिक,अनिता नलगोपुलवार, महादेव पचघरे, आनंद मलेवार, विजय पारधी, सचिन गायधने, चंदू सेलोकर, प्रिती शेंडे, आशा बोंदरे, शारदा गाढवे, प्रमिला साकुरे, योगिता लाला तरारे, मनिषा गायधने, रेखा हेडाऊ, वंदना पराते, पवन चव्हाण, रंजित उचिबगले, भूपेंद्र नागफासे, हेमचंद पराते, अरविंद येळने, सुमित पाटील, प्रदीप बुराडे, परमेश्वर नलगोपुलवार, हैशोक शरणागत, प्रभाकर बारई, महादेव बुरडे, आकाश गोदारे, रामकृष्ण ईटनकर, विकास सिंघानिया उपस्थित होते.

सभेत अजितदादा पवार यांनी गोरगरीब जनतेसाठी भरपूर योजना आणल्या मुले, सदर सभेत अभिनंदन ठराव घेण्यात आला. तसेच राष्ट्रवादी तालुका मोहाडीच्या सभेत मोहाडी तालुक्यातून तुमसर-मोहाडी विधानसभेसाठी राजू माणिकराव कारेमोरे यांचे एकच नाव सर्वानुमते वरिष्ठ नेत्यांना पाठवा असे सूचक विजय पारधी यांनी सुचविले तर त्याला अनुमोदन सदाशिव ढेंगे यांनी दिले व सवार्नुमते ठराव मंजूर करण्यात आला. सभेत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, तथा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा ६५ वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधत जनविशास सप्ताह साजरा करण्याचे कार्यकर्त्यांनासूचना देण्यात आल्या.

तसेच फळवाटप, पीक विमा, लाडली बहन योजना, वयोस्त्री योजना, लाडला भाऊ योजने विषयी गावागावात लोकांना योजना मिळाव्यात म्हणून कार्यकर्ते भेटी देणार, तसेच आरोग्य शिबीर घेण्यात येणार, सभेत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. मोहाडी तालुक्यातील ७ जिल्हा परिषद क्षेत्र व २ शहर यांचा बूथ निहाय आढ- ावा घेण्यात आला.तसेच नव्याने बूथ बांधणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रास्ताविक सदाशिव ढेंगे यांनी केले. संचालन सुभाष गायधने यांनी केले तर आभार रोहित बुरडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव कारेमोरे, प्रसन्ना थोटे, यशवंत बावणे यांनी परिश्रम केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *