अर्जुनी मोर तालुक्यात पावसाचा जोर अद्यापही कायम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : तालुक्यात गेल्या चार पाच दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे. अनेक घरांची पडझड सुरु आहे. गौरनगर येथील राजीव अधिकारी हा बारा वषार्चा मुलगा नाल्यात वाहून गेला असून प्रशासनाचे वतीने शोधकार्य सुरु असल्याचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी सांगीतले. तालुक्यात पावसाचे थैमान सुरु आहे. अनेक गावात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

आदिवासी दुर्गम भाग असलेल्या केशोरी परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अनेक गावे पावसाच्या पाण्याखाली आली आहेत. तर महागाव परिसरातही पूरग्रस्त परिस्थिती आहे. बोरी गाव पुराच्या वेढ्यात सापडला आहे. तालुक्यातील पिके पाण्याखाली आलेली आहेत. तालुक्यात अनेक गावात घरांची पडझड सुरु आहे. बोरी-बोडदा मार्गावरील गाढवी नदीवरील पुलावरुन दोन ते तीन फुट पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर गौरनगर येथील बारा वर्षाचा मुलगा नाल्यातील पुरात वाहून गेला. सध्या तालुक्यात अतिवृष्टीमुळे जीवहाणी व वित्तहानी होत आहे. नवेगावबांध जलाशय ओवरप्लो झाला असून इटियाडोह धरण ओव्हरμलो होण्याच्या मार्गावर आहे.

प्रशासनाने पुरपरिस्थीतीवर लक्ष ठेवून नुकसानीचे पंचनामे करावे – बडोले

अर्जुनी मोरगाव तालुक्यात सध्या मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. जीवीत व वित्त हानी सुरु आहे. तालुका व जिल्हा प्रशासनाने सजग रहावे. येणाºया पुरपरिस्थीतीवर लक्ष केंद्रीत करावे. घरांची पडझड व जे काही शेतीचे नुकसान होत असेल अशांचे त्वरीत पंचनामे करुन त्यांना शासकीय मदत मिळवून द्यावे, अशा सुचना माजी सामाजिक न्याय मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी प्रशासनाला दिले आहे. गौरनगर येथील मुलगा वाहून गेल्याने त्यांनी आपत्ती व्यवस्थापन बरोबर संपर्क साधला आहे. तसेच अर्जुनी मोर. तालुक्यातील पुरपरीस्थीतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी व तहशिलदार यांना भ्रमणध्वनीवर दिल्या आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *