भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गेल्या दोन दिवसांपासून पासून भंडारा जिल्ह्यात पावसाने थैमान मांडला आहे. या मुसळधार पावसा मुळे पवनी तालुक्यातील अनेक गावे व हजारो एकर शेती पाण्या खाली आली. याची माहिती मिळताच आम. नरेंद्र भोंडेकर यांनी रविवार व सोमवार दोन्ही दिवस पवनी तालुक्यातील पुर परिस्थितीची पाहणी केली. जय गावात पोहचू शकत न्हावते अश्या ठिकाणी आम. भोंडेकर ही ट्रॅक्टर ने पोहोचले आणि पुर ग्रस्तांना सहकायार्चा हात दिला. सोबतच पुरात झालेल्या नुकसणाचे तत्काळ पंचनामे करून सर्वांना सरसकट नुकसान भरपाई देण्याचे प्रस्ताव शासन कडे पाठविण्याचे निर्देश आम. नरेंद्र भोंडेकर यांनी तहसीलदारांना दिले.
दोन दिवसांपूर्वी मध्य रात्री पासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि ग्रामीण क्षेत्रातील अनेक गावांना पाण्याने वेढा घातला, या पुरामुळे अनेक शेतकºयांची पिकेही पाण्याखाली आली आहे. याची माहिती आम. नरेंद्र भोंडेकर यांना मिळताच आम. भोंडेकर यांनी शनिवारीमुंबई वरुन सरळ पवनी तेथे प्रस्थान केले. पवनी पोहचून सर्वप्रथम आम. भोंडेकर यांनी ज्या गावात पुर परिस्थिति निर्माण झाली आहे अश्या गावांना भेट दिली. यात वाघबोडी पूल, वलणी, शिवणाला, आसगाव, मांगली, पौना खुर्द, बोरगाव, भावड या गावांना भेट देऊन पुर परिस्थितिची पाहणी केली. गावात पानी शिरल्या मुळे आसगाव येथील संत कुटुंबांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे, ज्यांना आम. भोंडेकर यांनी भेट दिली आणि त्यांच्या पुनर्वसन संदर्भात शासन दरबारी दाद मागण्याचे आश्वासन दिले.
आम. भोंडेकर यांनी सोमवारी सुद्धा पवनी तालुक्यातील अनेक गावांच्या पुर परिस्थिति ची पाहणी केली. आम. भोंडेकर यांनी आसगाव, लावडी, मोवरी, भावड, बोरगाव, सेंद्रि (बुज) व धमनी या गावी पोहचून पुर बाधित नागरिकांशी भेट घेतली आणि त्यांनी त्यांना यथासंभाव मदत मुळावून देण्यात येईल असे आश्वस्त केले. काही गावात जलस्तार इतका अधिक होता की गावातपोहोचणे शक्य न्हवते. अश्या ठिकाणी आम. भोंडेकर यांनी ट्रॅक्टर ने पोहचून नागरिकांना सांत्वना दिली. या दौºयात सोबत असलेले तहसीलदार व अन्य अधिकाºयांना आम. भोंडेकर यांनी निर्देश दिले की त्यांनी आपली यंत्रणा तत्काळ कामावर लावावी आणि शेती चे झालेल्या नुकसनाचा सर्वे करावा. यात नुकसान झालेल्या शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई मिळेल असा प्रस्ताव शासन कडे सादर करावा.
सोबतच ज्यांच्या घरांची पडझड झाली असेल त्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश आम. नरेंद्र भोंडेकर यांनी दिले. या वेळी उपजिल्हा प्रमुख विजय काटेखाए, तालुका प्रमुख प्रशांत भुते, युवा सेना जिल्हा प्रमुख आशीष माटे, यू. से. उप जिल्हा प्रमुख भोजू वैद्य, यू. से. संघटक किशोर पंचभाई, शहर प्रमुख विकास सरोदे, सहकार आघाडी जिल्हा प्रमुख जितेश ईखार, बलू फुंडे, किशोर मेंढे, श्रीधर वैद्य, हर्षद भुरे, नीलेश पालांदुरकर, स्वप्नील ब्राम्हणकर, नीलेश सावरबांधे, राहुल काटेखाए व शिवसैनिक दौºयात शामील झाले.