झिरो बॅलन्स खाते उघडा-सुनील फुंडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्य सरकारने महिलांच्या जिवन उत्थानासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. ही योजना जनसमान्य पर्यंत पोहचविण्यासाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला असुन झिरो बॅलन्स खाते उघडण्याची मोहिम सुरु केली आहे. योजनेसाठी बचत खाते असणे आवश्यक आहे. बँक झिरो बॅलन्स खात्याच्या माध्यमातुन महिलांना मदतीचा हात पुरवित आहे. अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेतंर्गत राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, त्यांचे आर्थिक व सामाजीक पुर्नवसन करणे,स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे तसेच महिला व त्यांच्यावर अवलबुन असणाºया मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील महिलेला मिळावा यासाठी अर्ज भरुन घेण्यात येत आहे. अर्ज भरतांना त्यात बँक खात्याची माहिती भरणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रत्येक शाखांमधुन यातील पात्र महिलांचे झिरो बॅलन्स खाते उघडुन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी सांगीतले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *