अर्थसंकल्पातुन विकसित भारताचे उद्दिष्ट साधण्याच्या दिशेने वाटचाल – आ.भोंडेकर

आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमन यांनी प्रस्तुत केलेला अर्थसंकल्प हा प्रती वर्षा पेक्षा वेगळा आणि सवसामान्यांना सुखावणारा आहे. यात २०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्टे ठेवून सर्वसामान्यांना सामावून घेतले आहे. यात शेतकरी असो अथवा युवावर्ग, मध्यम वर्गीय असो अथवा गृहणी सर्वांना सुखद अनुभव देणारा हा बजट आहे. या बजट मधील कृषि क्षेत्रा करिता १.५ लाख कोटी ची तरतूद केली असून युवकांच्या कौशल्यावर पुढील ५ वर्षात दोन लाख कोटींच्या चालविल्या जाणाºया योजना ४.१ कोटी युवकांना लाभ पोचविणार. सोबतच देशातील ५०० मुख्य कंपन्यांमध्ये एक कोटी युवकांना एप्रेन्टशिप चे अवसर देवून ५००० रु प्रतिमह आणि ६००० रु. एकमुस्त मदत दिल्या जाणार. या वरुन दिसून येते की मोदी सरकार ही जितकी शेतकºयांची चिंता करते, तितकीच युवकांची सुद्धा. हेच नाही ता सरकार ने टॅक्स सूट ५ लाखावरुन ७.५ लाख करून मध्यमवर्गीयांना सुद्धा खुश केले आहे आणि पहिल्या नोकरीतिल ईपीएफओ मध्ये १५ हजारची मदत ही प्रथमत:च देण्यात येत आहे. जयमुले भविष्यात बेरोजगारी दर कमी होण्यास चांगलीच मदत होईल आणि शेतकºयांना देण्यात येणाºया योजनेमुळे शेतकºयांचे जीवनमान ही उंचावणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *