वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभा निवडणुकांपूर्वी सरकारचं अंतरिम बजेट सादर करत असून या बजेटदरम्यान त्यांनी मोफत वीज देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. रूफटॉप सोलर पॅनलच्या माध्यमातून सरकारकडून १ कोटी घरांना दरमहिन्याला ३०० यूनिट मोफत वीज दिली जाईल, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. “सरकारकडून मत्स योजनेसह मोहरी आणि भुईमुगाच्या शेतीला प्रोत्साहन दिलं जाईल. तसंच कृषी क्षेत्रासाठी मॉडर्न स्टोरेज आणि सप्लाई चेनवर सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे. छोट्या शहरांना जोडण्यासाठी ५१७ नव्या मार्गांवर व ऊअठ योजनेच्या अंतर्गत काम होणार आहे. सर्वांसाठी घर, पाणी आणि वीज यावर आमचा भर आहे,” असा दावाही निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर करताना केला आहे.
दरम्यान, मागील १० वर्षांत २५ कोटी लोग गरिबी रेषेच्या वर आले. ८० कोटी लोकांना मोफत राशन देण्याची व्यवस्था करण्यात आली. तसंच शेतमालाची किमान आधारभूत किंमत आमच्या सरकारने वाढवली, अशी माहितीही अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. अखेर २३ जुलै रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गाला मोठ्या अपेक्षा असून गरीब आणि शेतकºयांसाठी मोठं गिफ्ट मिळालं आहे. अर्थसंकल्पामध्येवेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. आर्थिक वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी लोकसभेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठ्या घोषणा केल्या.