भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा विकास आराखडा अंतर्गत दुग्ध उत्पादनात वाढ करणे, चाºयाची पौष्टिकता वाढविणे तथा कमी खर्चात चारा उत्पादन करून चाºयावर होणारा अधिकचा खर्च कमी करून आर्थिक उत्पन्नात भर घालणे व रोजगार उपलब्धी ह्या दृष्टीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नुकतीच पशुसंवर्धन विभागाची बैठक घेतली. जिल्ह्यात पशुपालकांकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या तनस वर प्रक्रिया करून सकस चारा रुपातर करणे बाबत चर्चा करण्यात आली. उपलब्ध चाºयापासून टिएमआर ब्लॉक्स तयार करण्याबाबत वरिष्ठ महाप्रबंधक, डॉ.व्ही.श्रीधर, यांनी सूचित केले. पशुपालकाना साठवणुकीसाठी व टिकविण्यासाठी तथा वाहतुकीसाठी TMRBlocks सहज शक्य होतात.व पशुपालक याची निर्मिती तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यास सहज तयार करू शकतील. जिल्ह्यात मका लागवड वाढ झालेली असून धान्य रूपातील मका काढून घेतल्या नंतर उर्वरित रोपटे यापासून मुरघास तयार करता येऊ शकतो किंवा याचा वापर TMRBlocks करीता सुद्धा होऊ शकतो. भंडारा जिल्ह्यात तनस व रब्बी हंगामातील उत्पादना नानात्र उर्वरित वाळलेला चारा यावर कल्चर किंवा Enzyamatic प्रक्रिया करून निकृष्ट चाºयाची पौष्टिकता वाढवता येते. व रु.५/- खर्चा मध्ये ५०० ेह्ण दुधात वाढ होत असल्याचे श्ठकळ प्रोफेसर डॉ.मांडगवने, यांनी सांगितले व प्रायोगिक तत्वावर कल्चर किंवा Enzyame उपलब्ध करून दिले जाईल. व प्रशिक्षण सुद्धा दिले जाईल. असे डॉ.मांडगवने, यांनी कळविले.
या बैठकीला प्रादेशिक प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, नागपूर विभाग नागपूर डॉ.सतीश राजू, व्हिएनआयटी प्रोफेसर डॉ.मांडगवने, वरिष्ठ महाप्रबंधक, डॉ. व्ही. श्रीधर, प्राध्यापक माफसु, नागपूर डॉ.अतुल ढोक, कृषी विज्ञान केंद्राच्या, डॉ.उषा डोंगरवार, प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती उर्मिला चिखले, जिल्हा पशुसंव र्धन उपआयुक्त, भंडारा डॉ. वाय.एस.वंजारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा डॉ.जगन्नाथ देशट्टीवार, जिल्हा नियोजन अधिकारी श.क.बोरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीमध्ये चारा विषयक भंडा- रा जिल्ह्याची पार्श्वभूमी, योजना व शासन निर्णय यांचे सादरीकरण व माहिती पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी सादर केली. चारा प्रक्रिया प्रशिक्षणा करीता जिल्ह्यात आत्मा अंतर्गत, माविम अंतर्गत, तथा कृषी विज्ञान केंद्र, भंडारा (साकोली) अंतर्गत कार्यरत शेतकरी बचत गट/ उत्पादक गट यांना Culture तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन पुढे यामध्ये रोजगार उपलब्धी करता येईल असे प्राध्यापक डॉ.मांडवगने, यांनी स्पष्ट केले