वसतिगृहासाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : गेल्या सात वषार्पासून वसतिगृहाच्या आश्वासनांचे गाजर पचवित असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बाण आता तुटायला लागला आहे. शैक्षणिक सत्र सुरू होवूनही वसतिगृह न मिळाल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी प्रादे-ि शक समाज कल्याण विभागाजवळच्या वसतिगृहासमोर सकाळपासून ठिय्या आंदोलन केले. ताबा मिळेपर्यंत जागेहून न हटण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. ़ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोर्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या सुरू आहे. ते म्हणाले, २०१७ साली तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींचे दोन असे राज्यभरात ७२ वसतिगृह सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर हा विषय रखडत गेला व आश्वासनही हवेत विरले. ओबीसी मंत्र्यांनी १५ आॅगस्ट २०२३ पर्यंत वसतिगृह सुरू करू असे पावसाळी अधिवेशनात सांगितले होते. परंतु आता आॅगस्ट २०२४ पर्यंत शासनाने वसतिगृह सुरू केलेले नाही. यंदा पुन्हा ओबीसी संघटनांनी मागणी रेटून धरल्यानंतर विभागाच्या अधिकाºयांनी ओबीसी वसतिगृहासाठी भाड्याची जागा घेतली असल्याचे सांगितले. राज्यातील काही जिल्ह्यात २२ ठिकाणी जागा तिळाल्याचे व या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश सुरू होतील, असे सांगण्यात आले होते. नागपुरात बहादुरा येथे भाड्याने जागा मिळविल्याचेही सांगण्यात आले.

मात्र शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही वसतिगृह न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा असंतोष वाढत चालला आहे. मागील सात वषार्पासून शासन फक्त घोषणा करत आहे. मागील सत्रात इमारत नाही म्हणून वस्तीगृह सुरू केले नाही. या सत्रात इमारती आहेत, तर फर्निचर नाही म्हणून वस्तीगृह सुरू होत नाहीत. यापुढे कुठलेही नवे आश्वासन किंवा पुढची तारीख ऐकूण घ्यायची नसून आता थेट वसतिगृहाचा ताबाच घेण्याचा विचार करीत विद्यार्थ्यांनी १ आॅगस्टला सकाळी ११ वाजतापासून बहादुºयाच्या इमारतीसमोर हे विद्यार्थी वसतिगृहाबाहेर ठिय्या मांडून बसले होते. दरम्यान विभागाच्या सहायक संचालकांनी आंदोलक विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंतची मुदत मागितली. मात्र तसे लिखित पत्र आणि शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून दीड महिन्याचा निर्वाह भत्ता दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा उमेश कोर्राम यांनी दिला आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *