भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोरेगाव तालुका येथे वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात लाच स्विकारताना अडकल्याची घटना आज गुरुवारला सायकांळी घडली. गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील तक्रादाराचे प्रोत्साहन भत्ता काढून देण्याकरीता आरोपी लोकसेवक सुरेश रामकिशोर शरणागत वय ३६ वर्ष ,पद – लेखापाल (कंत्राटी), तालुका नियंत्रण पथक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गोरेगाव. रा. चोपा ता. गोरेगाव जि. गोंदिया यानी ३००० रुपयाच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंति लाच मागणी २५०० रुपये ची लाच स्विकारताना अटक करण्यात आली. तक्रारदार या प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत उपकेंद्र गिधाडी ता गोरेगाव येथे कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. आलोसे हे तालुका नियंत्रण पथक गोरेगाव येथे कंत्राटी लेखापाल म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांचे १६ हजार ५०० रुपये रकमेचा ईंसेंटीव्ह ( प्रोत्साहन भत्ता) काढून दिल्याच्या मोबदल्यात आलोसे हा ३००० रुपये लाच मागणी करीत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. लाच मागणी करीत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष आरोपीने ३ हजार रुपये ईतक्या लाच रकमेची मागणी करुन तडजोडी अंती २५०० रुपये लाच मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली. सापळा कारवाई दरम्यान आलोसे याने पंचासमक्ष २५०० रुपये लाच रक्कम स्वीकारली असता आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.