भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे पाणीपुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील ५० ते ६० गावकºयांना अतिसाराची लागण झाल्याची घटना बुधवारी ३१ जुलै सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. लगेच १५-१६ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर संभाव्य धोका लक्षात घेता नवेगावबांध येथील पाणीपुरवठा आज गुरूवार १ आॅगस्ट पासून बंद ठेवण्याचे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार येथील इंदिरानगर व आखर मोहल्ला प्रभाग क्रमांक ३ व ४ येथील ५० ते ६० नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याची बाब बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. वैद्यकिय तपासणी नंतर अंदाजे ५०-६० व्यक्तींना अतिसाराची लागण झाली आहे. ज्यांना अतिसाराची लागण झाली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहे. पण बाधित व्यक्ती विविध कारणे देत रुग्णालयात दाखल होण्यास नकार देत असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे यांनी बोलताना सांगितले. दूषित पाणीपुरवठ्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता लक्षात घेऊन आज गुरुवार पासून गावातील नळयोजनेद्वारा होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाने संबंधित विभागाला दिले आहे.
आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
अजुर्नी मोरगावच्या तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दखणे व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी गावात अतिसाराची लागण झाली आहे. याबाबत बुधवारी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. युगा कापगते व डॉ. शुभांगी बोरकर यांनी ग्रामपंचायतमध्ये आयोजित बैठकीत दिली. यानंतर आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे.गावाला येथील जलाशयातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सध्या मुसळधार पाऊस व पूर आल्यामुळे जलाशयातील पाणी गढूळ झाले आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही असा निवार्ळा आरोग्य विभागाने दिला आहे. यातूनच गावकºयांना अतिसाराची लागण शंका व्यक्त केली जात आहे, तर काही दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येऊ नये. अशा सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.