दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे हाल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शहरातील खड्ड्यांचा विषय नवीन नसला तरी गत दोन दिवसांपासून आलेल्या दमदार पावसामुळे भंडाऱ्यातील रस्त्यांचे बेहाल झाले आहे. एकीकडे कोट्यवधींचा निधी आणून सिमेंट रस्ते बनविण्याचा सपाटा सुरूअसताना डांबरी रस्ते मात्रब पावसामुळे उखडले आहेत. भंडारा शहराची लोकसंख्या लक्षात घेता, वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराचा जसजसा विस्तार वाढत गेला, तसतशी रस्त्यांचीही संख्या वाढत गेली. आजही भंडारा शहराला लागून असलेल्या आऊटर कॉलनीमधील रस्त्यांची दैनावस्था आहे. म्हाडा नगर असो की तकिया वॉर्ड परिसरातील भाग, येथे कच्चे रस्ते हमखासपणे दिसतात. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात आल्यावर हे मुख्यालय आहे की खड्डेमय शहर, असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. पंधरवड्यापूर्वी मुस्लिम लायब्ररी चौक ते कॉलेज मार्गापर्यंतचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, २०० मीटर हाकेच्या अंतरावर असलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकातील खड्डे मात्रब स्थानिक प्रशासनाला दिसले नाहीत. ते खड्डे जीवघेणे होते म्हणूनच डागडुजी करण्यात आली, असा युक्तिवाद सुद्धा चांगलाच रंगला होता. रस्त्यावरील राजकारण रंगले असतानाच शुक्रवारी रात्र्ीपासून आलेल्या दमदार पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची पुन्हा पोलखोल केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *