भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करतांना येणाºया अडचणी ५ आॅगस्टपर्यंत दूर कराव्यात, अन्यथा ई-पाश मशिन तहलसी कार्यालयात जमा करण्याचा इशारा तालुक्यातील प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेनी ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाºयांना निवेदनातून दिला होता. मात्र कुठलीच कार्यवाही न झाल्याने अखेर संघटनेच्या वतीने आज ५ आॅगस्ट रोजी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करून तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदन दिले. निवेदनानुसार, राज्यात साधारण ५४ हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणीकीकरणानंतर सन २०१८ पासून ई-पास मशीनद्वारे धान्य वितरण करत आहेत. तद्नंतर कालबाह्य झालेल्या टू जी ई-पास मशीन बदलून दोन वषार्पूर्वी अत्याधुनिक फोर जी सपोर्टेड मशीन देण्यात आल्या. परंतु, नवीन ई- पास मशीन पेक्षा टू जी मशीन चांगली होती, अशी म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन महिन्यापासून ई-पास मशीनवर धान्य वितरण करताना सर्व्हर डाऊन येणाºया तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करता येत नाही. त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. दुकानदार दुकानांमध्ये धान्य साठा उपलब्ध असून देखील धान्य वितरण करू शकत नाही.
याबाबत तालुका स्तरापासून राज्यस्तरावर अनेक वेळा तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारे सकारात्मक उपाययोजना झालया नाहीत. त्यामुळे पुढील काळात स्वस्त धान्य दुकानदार आपापल्या तहसील कार्यालयात ई-पास मशीन जमा करतील असा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात २५ जुलै रोजी प्रधान सचिवांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या विषयावर कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. परिणामी ५ आॅगस्ट रोजी ई-पॉश मशीन आपापल्या तहसील कार्यालयात जमा करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अर्जुनी मोरगाव तालुका प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज सर्व रेशन दुकानदारांनी ई-पॉश मशीन तहसीलदारांकडे सोपवून निवेदनही दिले. इंटरनेट पुढे रेशन दुकानदार हतलब असून रेशन वाटपात अडचण निर्माण झाल्यास ग्राहक दुकानदारावर रोष व्यक्त करतात. इंटरनेट सेवा सर्व्हरमुळे धान्य वाटपात खूप अडचणी येतात. त्यामुळे आॅफलाईन पद्धतीने धान्य वाटपास मंजुरी द्यावी, महागाई इष्टांगानुसार तीनशे रुपये क्विंटल कमिशन व केवायसी मोबदला पन्नास रुपये प्रति व्यक्ती द्यावा आदी स्वस्त दुकानदारांच्या मागण्या आहेत.