भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्रीय अर्थसंकल्पाने अनेक महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत आणि कृषी, तरुण, मध्यमवर्ग, महिला आणि लघु उद्योगांवर भर दिला आहे असे अर्थसंकल्पावर पत्रकार परिषदेत बोलताना समीर बाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सरकारने आता तरुणांचे कौशल्य आणि लघु आणि मध्यम उद्योगांना बँक पतपुरवठा करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र सरकारचा महसूल आणि खर्चही त्यांनी विशद केला. ते म्हणाले की, सरकारने मोठ्या प्रमाणात इंफ्रास्ट्रक्चर साठी ११.०० लाख कोटी ची तरतूद केली आहे. ते म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था आता देशांतर्गत मागणी आणि पायाभूत गुंतवणुकीद्वारे प्रचंड प्रमाणात वाढेल. वाढवण बंदर ७६००० कोटी, विदर्भासाठी ६०० कोटी रुपयांची दुष्काळी मदत, मेट्रो, गावातील रस्ते, स्रें८ हाऊसिंग आदींसह महाराष्ट्रासाठी केलेल्या वाटपाचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. केंद्रीय योजनांमध्ये महाराष्ट्राला नेहमीच सर्वाधिक वाटा मिळाला असून विरोधक अर्थसंकल्पाच्या विरोधात खोटं पसरवत असल्याचेही ते म्हणाले.
वित्तीय तूट आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरका- रचे वित्तीय व्यवस्थापनही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रासाठी वाटपाच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, वाटप जरी टक्केवारी मध्ये कमी असला तरी मागील वर्षा पेक्षा तो वाढून १.२५ लाख कोटी रुपये झाला आहे. ते म्हणाले की, एक मोठा भाग कौशल्यासाठी देखील समर्पित आहे, ज्याचा देखील शिक्षणाचा भाग म्हणून विचार केला पाहिजे. भांडवली नμयातील बदलांमुळे बहुसंख्य मध्यमवगीर्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, सरकार शेती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करत असून १ कोटी शेतकºयांना नैसर्गिक शेतीसाठी मदत केली जाईल. छोट्या उद्योगांसाठी सिडबी बैंक अजुन विशेष शाखा उघडणार आहे. ते पुढे म्हणाले की एनडीए सरकार ने मागील दहा वर्षात शौचालय, घर, बिजली, ग्रामीण रस्ते अशे लोकांचें मूलभूत प्रश्न मार्गी लावून आता अर्थव्यस्थेसाठी भक्कम पाया तयार केला आहे. पत्रकार परिषदेला , भाजपा वरिष्ठ नेते उल्हास फडके , जिल्हा महामंत्री आशु गोंडाने , भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभळकर , रूब्बी चढ्ढा , प्रशांत निंबोलकर उपस्थित होते