भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील गोसे प्रकल्प अंतर्गत बाधित गावांच्या समस्या घेऊन गावकºयांनी आ. नरेंद्र भोंडेकर याची भेट घेतली. आ. भोंडेकर यांनी आज तात्काळ जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत संबंधित विभागाची बैठक बोलावुन गावकºयाांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. बैठकीत बांधीतांच्या समस्यांवर चर्चा करून बाधीत गावाच्या रखडलेल्या कामाचा आढावा घेत त्या कामाला गती देण्या सह, भूमी अधिग्रहण, गोसे बंधितांचा मोबदला आणि भूखंड वितरण या विषयावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना सूचना केल्या. मागील महिन्यात आम. नरेंद्र भोंडेकर यांनी पुनर्वसन संदर्भात आढावा बैठक घेऊन पुनर्वसन विभाग सह जिल्हाधिकाºयांना पुनर्वसन ची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. यावरही विभागद्वारे कामात दिरंगाई होत असल्याने आज सकाळी सुरेवाडा, बेरोडी, अर्जुनी, सलेबर्डी, पिंडकेपर सह करधा येथील साई मंदिर परिसरातील नागरिकांनी आम. भोंडेकर यांचे कार्यालय गाठले आणि आम. भोंडेकर यांच्या समक्ष गावाची व्यथा मांडली.
जिल्हाधिकारीं योगेश कुंभेजकर यांच्या दालनात आयोजित बैठकीत आम. नरेंद्र भोंडेकर यांनी पिंडकेपार येथील बंधितांचा उर्वरित मोबदला, करचखेडा आणि बेरोडी गावातील परिवारांचे पुनर्वसन, सुरेवाडा येथील बाधितांना प्लाट व पट्टे देण्या संदर्भात, ज्या कुटुंबीयांना दोन लाख नव्वद हजार रुपये वाटप झाले नाही त्यांना तात्काल निधी वाटप करणे तसेच करधा येथील साई मंदिर परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन कण्यासंदर्भात चर्चा करून समस्यांचे लवकरात निराकरण करण्याच निर्देश दिले. या सोबतच ज्या क्षेत्रात आधी पुनर्वसन झाले आहे त्या क्षेत्रातील रास्ते व नाल्या खराब झाले असल्यास त्यांच्या दुरुस्ती करीता निधी कसा आणता येईल यावर चर्चा करून तोडगा काढण्यात आला. एवढेच नाही तर गोसे प्रकल्प झीरो लेवल भरल्यावर अपेक्षित नसतांना जी गावे पाण्याखाली गेली त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करून मोबदला देण्याचे निर्देश आम. भोंडेकर यांनी संबंधित विभागास दिले.