रा ज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे जोर- दार वाहत असून प्रत्येक पक्ष किंबहूना महायुती आणि महाविकास आघाडी आप-आपले उमेदवार चाचपणी करण्यात मग्न आहेत. राज्यातील प्रत्येक मतदार संघातील उमेदवार आणि जनता यांचे सर्वेक्षण करण्याचे काम जोमात सुरू आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे सत्येचे भागीदार असून येणारी विधानसभा हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार हे निश्चित आहे. यात भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता मुख्यत: गोंदिया मा. प्रफुल्ल पटेल यांचा गृहजिल्हा असून त्यांचे समर्थक राजेंद्र जैन जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. जैन यांनी चौफेर पक्षाचा प्रचाराचा डंका वाजवून आघाडी घेतल्याचे दिसून येते. जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपल्या संपूर्ण ताकदीने प्रचाराला लागला आहे. गोंदिया खा. पटेलांचा जिल्हा असून त्यांचे खंदे समर्थक माजी आ. राजेंद्र जैन यांनी प्रचाराचा सपाटा लावला. त्यात प्रत्येक गावात सभा घेवून कार्यकर्ते आणि जनतेच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न व समस्या जाणून घेण्याचा निर्धार केला आहे. संपूर्ण गोंदिया व भंडारा जिल्हा पिंजून काढले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
येत्या विधानसभेत उमेदवारीची तिकीट मिळाल्यास स्वत: लढण्याचा विचार त्यांनी केला आहे. त्यांचे प्रचार तंत्र व जनतेशी जवळीक पाहाता त्यांचा निर्धार योग्य असल्याचे जाणवते. माजी आ. राजेंद्र जैन यांचा प्रचार आणि प्रसार महायुतीला जिल्ह्यात मजबुत करण्यावर असून महायुतीमधील अजित पवार गटाचे सर्वेसर्वा मा. खा. प्रफुल्ल पटेल यांचे ते काम पाहतात. खा. पटेल राज्य सरकारमधील दुवा असून महायुती सरकार खा. प्रफुल्ल पटेल यांच्या सारख्या बलाढ्य नेत्यावर टिकूण आहे. मा. खा. पटेल जिल्ह्यात असो वा नसो, माजी आ. जैन खा. पटेलांचे काम उत्तमरीत्या सांभाळतात. तब्बल ४० वर्षापासून खा. पटेलांचे सोबती म्हणून जिल्ह्यांना सर्वांगीण परिचित जैन खा. पटेलांसोबत असलेले गुरू शिष्याचे नाते सांभाळून जनतेच्या प्रत्येक समस्या, अडी अडचणी, कार्यकर्त्यांच्या भावना जवळूण पाहूण सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे खा. प्रफुल्ल पटेल केंद्र स्तरावर व राज्य स्तरावर तर माजी आ. राजेंद्र जैन हे जिल्हास्तरावर अथवा लोकसभा स्तरावर जनतेशी संपर्कात असतात. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील खा. पटेलांच्या गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे काम माजी आ. राजेंद्र जैन यांनी उत्तमरित्या सांभाळले असून नावारूपाला आणले आहे.
आज गोंदिया एज्युकेशन सोसायटी सर्वात मोठी आणि विश्वसनीय म्हणून काम करीत आहे ते राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नांमुळे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट गोंदिया जिल्ह्यात किंबहूना लोकसभा क्षेत्रात खा. पटेल यांच्या मुळेच केवळ जनतेचा पक्ष झाला असून खा. पटेलानंतर राजेंद्र जैन हेच पक्षाचा सर्वात मोठा चेहरा आहेत. त्यांचे कार्य पाहता आणि जनतेसोबत असलेला त्यांचा सुसंवाद, कार्यकर्त्यांशी असलेले नाते, स्वत:ला वाहून देण्याचा निर्धार, जनतेच्या संर्पकासाठी फक्त तीन तास झोप घेणारे यांचे व्यक्तीमत्व पाहता येणारी विधानसभेची निवडणूक पक्षाला सहज सोपी जाणार आहे. त्यात ही माजी आ. राजेंद्र जैन यांना पक्ष तिकीट देवून लढण्याची संधी देणार यात शंका नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने ‘वाजेल चौफर डंका’ म्हणणे योग्य आहे. गुरू शिष्य नाते सांभाळतांना खा. पटेल गुरूच्या भुमिकेत तर माजी आ. राजेंद्र जैन शिष्याच्या भुमिकेत तब्बल ४० ते ४५ वर्षाच्या कालावधीपासून आहेत. त्यामुळे खा. पटेलांशी त्यांची भावनीक जवळीक असून जनतेशी जिवाळ्याचे प्रेम आहे. आणि हे वृध्दींगत होत आहे. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी, त्यांनी आजवर केलेल्या कायार्साठी तसेच जनतेशी सांभाळलेल्या प्रेमासाठी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !