ठेकेदार को आमदार बनाओंगे, तो डुबता हुआ शहर पाओंगे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हयातील आठ ही तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मूसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यासह गोंदिया शहरात पण गेल्या दोन दिवसांपासून पाउसाची रिपरिप सुरु आहे. त्यात गोंदिया शहरातील या पाण्याचा निचरा पूर्णपणे होत नसल्यामुळे गोंदिया शहरातील ठिकठिकाणी पाणी जमा होत असून यामुळे गोंदियाकरांना ये जा करायला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनतेची ही समस्या धरुन आज ७ आॅगस्ट बुधवार ला गोंदिया शहरातील मामा चौकात प्रदेश काँग्रेस सहसचिव राजीव ठकरेले यांनी आपल्या समर्थकांसह विविध विरोधी फलकाचे बॅनर बनवत आंदोलन केले. दरम्यान त्यांनी आपल्या समर्थकांसह ‘ठेकेदार को आमदार बनाओंगे, रोजगार कहां से पाओगे, पैसों में बिककर वोट दोंगे डुबता हुआ प्रशासन पाओंगे, ५०० रुपये में बिक जाओंगे, डुबता हुआ शहर पाओगे, आणि १०० रुपये का मुर्गा खाओगे मुर्गा बनके रह जाओंगे’, म्हणत काँग्रेस पार्टी ने गोंदिया विधानसभाच्या फलक लावून मामा चौकात या ठिकाणी आंदोलन केले. दरम्यान काँग्रेस नेते राजीच ठकरेले यांनी सांगीतले की गोंदिया शहरात ठिकठिकाणी गट्टू लावण्यात आले आहेत पण यांना लावतांना लांबी रुंदीच उंच खाल अशी काहीच बघितले गेले नसून कुठं उंच खाल अश्या प्रमाणे हे लावण्यात आलेले आहेत.

यात नगर परिषदेतील अभियंत्याने हे लावतांना याची क्वालिटी कंट्रोल कडून तपासणी केली की नाही. यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रसंगी त्यांनी आरोप लावले की स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनी नगरपरिषदे मार्फत आपल्या पाठीराख्यांना ठेकेदार करित हे गट्टू लावण्याचे काम दिले. तसेच नगर परिषद येथील अधिकाºयांना पाठीशी धरून बात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून या सगळ्या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच पावसाळ्यात शहरातील ठिकठिकाणी भरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे खड्डयात पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या खड्डयांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे. तसेच आमदारांनी काही अभियंता यांनाचा ठेकेदार करून काम दिले असले तरी त्यांनी यात संपूर्णपणे ठेकेदारी करीत हे काम संपूर्ण शहरात कोणतीही प्रामाणिकता करूम केले नाही असे स्पष्ट होते. त्यामुळे आता राज्यात पुढील होणाºया विधानसभा निवडणुकीत गोंदिया शहरातील जनतेने अश्या ठेकेदार झालेल्या आमदाराला धडा शिकवण्याकरिता आपल्या मतांचा योग्य प्रयोग करून धडा शिकवावा अशी अपेक्षा गोंदिया शहरातील प्रबुद्ध जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *