भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी :येणाºया विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे भंडारा विधानसभेची उमेदवारी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाला सोडण्यात येण्याची मागणी पवनी येथील गांधी भवनात आयोजित तालुकास्तरीय व शहर कांग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात सवार्नुमते करण्यात आली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सदर मेळाव्याला जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्ष जयश्री बोरकर, विधानसभा समन्वयक प्रेम वनवे, सुभाष आजबले , जिल्हा महासचिव धर्मेंद्र नंदरधने, निलेश सावरबांधे, महिला जिल्हा महासचिव माधुरी तलमले, तालुका अध्यक्ष शंकर तेलमासरे, शहर अध्यक्ष रामचंद्र पाटील, मच्छीमार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पचारे , माजी नगराध्यक्ष मनोहर उरकुडकर, नगर परिषद माजी उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, सेवादल उपाध्यक्ष तूळशिदास बिलवने, जि. प. सदस्या पुजा हजारे, मनोहर मेश्राम, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष महेंद्र वाहणे महिला अध्यक्ष ललीता खोडकर, वर्षा पाटील, डॉ. कोहपरे, भगवान नवघरे, विपीन बोरकर, गोविंद हुकरे, चंद्रशेखर कावळे, बंडू पंडे यांचेसह बुथ प्रमुख, मंडळ अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायतसमिती सदस्य, विविध आघाड्यांचे पदाधिकारी.आजी माजी पदाधिकारी सरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बुथ आढावा व कार्यकतृर्यांचे मनोगत ऐकून घेण्यात आले.
दरम्यान येणाºया विधानसभा निवडणुकीची रणनीती काय असणार यावर चर्चा करण्यात आली. भंडारा विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षालाच देण्यात यावी असा ठरावही एकमताने पारित करण्यात आला.बैठकीला इच्छुक उमेदवार विकास राऊत , युवराज वासनिक, प्रेमसागर गणविर, धनंजय तिरपुडे, पुजा ठवकर, मनोज बागडे, राजकपुर राऊत, राजविलास गजभिये, पृथ्वीराज तांडेकर, अरविंद भालाधरे यांनी हजेरी लावली होती. सभेला मोहन पंचभाई, प्रेम वनवे, जयश्री बोरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुभाष आजबले तर आभार प्रदर्शन महिला शहर अध्यक्ष मिना जिभकाटे यांनी केले.