भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील पालडोंगरी गावातून ३५ वषार्नंतर अनुसूचित जातीमधून विजय ईस्तारु रामटेके यांची सहाव्या क्रमांकाची मुलगी कु.आचल रामटेके हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. आचलचे वडील सेवानिवृत्त कोतवाल तर आई तारा गृहणी आहे. आचलचा जन्म दि.५ मार्च २००१ असून आंगणवाडी शिक्षिका लक्ष्मी सूरदास डहाके यांनी बालपणी शिकविले. इयत्ता १ ते ४ जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालडोंगरी येथे शिक्षिका वंदना हनवते, ठवकर. इयत्ता ५ ते १२ वीपर्यंत सुदामा कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे वर्गशिक्षिका प्रज्ञा भुरे होते. शारीरिक शिक्षक विनायकराव वाघाये यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर कबड्डी स्पर्धेत सहभाग नोंदविला. इयत्ता १२ वीनंतर जे.एम.पटेल महाविद्यालय भंडारा येथे बीएससी करीत असताना मैत्रिणी पल्लवी मधुकर हारगुडे मोरगाव, पल्लवी जयपाल गोटेफोडे साकोली यांनी हिम्मत दिल्याने वॉरियर अकॅडमी भंडारा येथे तीर्थस लांजेवार यांच्याकडे पोलीस भरतीचे क्लासेस लावले.
यामध्ये अठरा महिन्यात मराठी ग्रामर, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान शिकविण्यात आले. पुष्पा योगीराज गजभिये चोरखमारी, मीनाक्षी सत्यजय मानवटकर पेट्रोलपंप, निशा अनुप भवसागर तुमसर, प्रज्ञा अश्विन भुतांगे चिखलामाईन ह्या चार बहिणी आणि शुभम विजय रामटेके एक भाऊ आहे. यामध्ये दुसºया क्रमांकाची बहिण मीनाक्षी सत्यजय मानवटकर हिने आर्थिकदृष्ट्या मदत केली. भंडारा जिल्हा पोलीस भरतीमध्ये एकूण ६० जागा होत्या. त्यापैकी ४८ मुले तर १८ मुलींच्या जागा होत्या. अनुसूचित जातीकरिता दोन मुलीकरिता राखीव होते. यामध्ये १०० मीटर धावणे, गोळा फेक, लेखी परीक्षा १०० गुणामधून ६१ गुण प्राप्त केल्याने बुधवार दि.१० जुलै २०२४ ला निकाल घोषित करण्यात आला. त्या यादीत कु.आचल विजय रामटेके हिची निवड झालेली यादी जिल्हा पोलीस मुख्यालयात लावण्यात आली. निवड यादीत नाव आल्याचे आई-वडिलांना भ्रमणध्वनीवर सांगताच डोळ्यात आनंदाश्रू आले. आपल्या कठोर परिश्रम, ध्येयवृत्ती आणि जिद्दीने हे यश मिळवले आहे. आचलने गावातील ईतर मुलींसाठी एक प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे. ३५ वर्षानंतर पोलीस खात्यात रुजू होणारी आचल पालडोंगरी गावातून पहिली मुलगी ठरली आहे.