चुलबंद नदीच्या पुरात इसम वाहून गेला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदुर : नदीकाठावर गायी चारण्यासाठी गेलेला इसम पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना तालुक्यातील पाथरी येथील चूलबंद नदी काठावर घडली. रूपादास रामजी वलथरे (वय ५८) रा.पाथरी असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे. दुथडी नदीत बैल धुण्याकरिता टाकले असता बैल (तावशी) काठावर गेले. त्यांना परत आणण्याकरिता पट्टीचा पोहकार रूपलाल रामजी वलथरे नदीच्या प्रवाहातून त्या काठावर जाण्याच्या प्रयत्नात पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. ही घटना लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकातील चुलबंद नदीपात्र पाथरी घाटावर गुरुवारला सकाळी ८:२५ वाजे दरम्यान घडली. गावातीलच देवेंद्र गणेश कठाने व धनराज गोपीचंद कोरे यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाहाच्या ओघात रूपलालचा थांगपत्ता सायंकाळपर्यंत लागला नाही. काठावर व परिसरात पोलीस, महसूल व गावकरी त्याचा शोध घेत आहेत. बैल धुण्याकरिता गेले असता बैल दुसºया घाटावर निघाले. त्यांना परत आणण्याच्या प्रयत्नाकरिता रूपलाल ने नदीपार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चुलबंद नदी दुथडी असून प्रवाह जोराचा असल्याने रूपलाल त्याला काठावर जाणे जमले नाही.

प्रवाहाच्या जोरदार लाठीत रूपलाल दिशेनासा झाला. त्याला तत्काळ शोधण्याकरिता कठाने व कोरे यांनी बांबूच्या साह्याने शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अथांग पाण्यात त्याचा शोध लागू शकला नाही. पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक कुंभरे व त्यांच्याटीमने जवळील घाटावर शोधा करिता प्रयत्न चालवले आहेत. लाखांदूर, पवनी व दिघोरी पोलीस स्टेशनला सूचना सुद्धा पुरविण्यात आलेली आहे. नायब तहसीलदार धर्मेंद्र उरकुडकर, मंडळ अधिकारी राकेश पंधरे, तलाठी सुनील कासराळे व कोतवाल सुभाष खंडाईत शिवार फेरी घालत काठावर लक्ष लावून आहेत. जिल्हा पोलीस आपत्ती व्यवस्थापनाला सूचना पुरविण्यात आलेली आहे. पाण्याला गती अधिक असल्याने शोध मोहीम थंडबस्त्यात आहे. रूपलाल हा गवंडी कामावर मजूर म्हणून काम करीत होता. पालांदूर येथे दररोजच गवंडी कामावर यायचा. घटनेच्या दिवशी अगदी सकाळीच नदी काठावर गेला. मात्र त्याचा शोध लागू शकला नाही. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. प्रशासनाच्या वतीने त्याचा शोध घेणे सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *