भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यात दमदार पाऊसाने हजेरी लावल्याने गोंदिया जिल्ह्यातून मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, नवनिर्वाचित राष्ट्रीय महामार्ग वरील मासुल कसा घाट जवळील उडाण पुलाची भिंत खाली कोसडली मात्र सुदैवाने कुठलीही जिवंत हानी झाली नसली तरी उडाण पुला खालून जाणाºया सर्व्हिस रोड वरील वाहण चालकाच्या बोनेट वर भिंतीचे गट्टू कोसडल्याने कार चालकाचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. गेल्या पंधरा दिवसात आलेल्या दमदार पाऊसाने अग्रवाल कंपनीच्या बांधकामची पोल खोल केली आहे तर दुसरीकडे मासुलकसा घाटात बांधण्यात आलेला उडाण पूल सुरु होण्याआधीच उडाण पुलाची भिंत कोसडल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. भारतीय राष्ट्रिय राज्य मार्ग प्राधिकरण यांनी अग्रवाल कंपनी ला ३५० कोटी मध्ये काम दिल्याचे सांगितले जातं आहे कंपनीतील काही अधिकाºयांच्या निष्काळजीपणा मुळे हि भिंत कोसळल्याचे सांगितले जात आहे.