‘त्या’ जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आर्थिक देवाण घेवाणीतुन झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी युवकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असुन त्याच्यावर नागपूर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. निशांत संतोष तांडेकर रविदास नगर तुमसर असे जखमी युवकाचे नाव आहे. दरम्यान पोलीस विभाग आरोपींची पाठराखन करीत असल्याचा आरोप जखमी युवकांच्या नातेवाईकांनी केला असुन त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकाना दिलेल्या निवेदनातुन सदर प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.छत्तीसगड राज्यातील महादेव अ‍ॅप च्या माध्यमातुन झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीतुन सदर युवकाला मारहाण झाल्याचा आरोप होत आहे.

रविदास नगर तुमसर येथीलफिर्यादी निशांत संतोष तांडेकर याला आजाद नगर तुमसर येथील आरोपी खुशाल आवेराज कनोजे याने विश्वासात घेवुन त्याचा बँक खाते क्रमांक व इतर माहिती घेऊन, लाखो रुपयाची अफरातफर केली. हा सगळा प्रकार फिर्यादीच्या लक्षात येताच फिर्यादीने आरोपीला माझ्या बैंक खात्यात एवढे पैसे कुठून आले. हे पैसे आॅनलाईन महादेव बुकी रेड्डी अण्णा अंबानी बुकी अ‍ॅप चे आहेत का? अशी विचारणा केली असता आरोपी खुशाल कनोजे हा फर्यादीला समाधानकारक उत्तर देवु शकला नाही. दरम्यान फिर्यादीने त्याच्या बँक खात्यातील ही रक्कम काढली.

सदर बाब आरोपीच्या लक्षात येताच, आरोपी खुशाल आवेराज कनोजे, शिवकुमार उर्फ सोनू नंदकिशोर मराठ यांनी . फिर्यादीच्या घरी जात चहा नाश्त्याचे निमित्ताने फिर्यादीला घराबाहेर घेवुन जात जबर मारहाण केली. सदर प्रकार हा आरोपींनी व्हिडीओ कॉलद्वारे अनोळखी इसमाला दाखवत होते. आरोपींनी फिर्यादीला हा प्रकार कुणाला सांगीतल्यास किंवा पोलिसात तक्रार केल्यास फिर्यादीच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने लगेच तुमसर पोलीस ठाणे गाठत पोलीसांनाघडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तुमसर पोलिसांनी आरोपी खुशाल आवेराज कनोजे, शिवकुमार उर्फ सोनू नंदकिशार मराठे यांचा विरुद्ध,क्रमांक ३०५/ २०२४ कलम ११५ (२), ३५२, ३५१ (२)भा.न्या. स.२०२३ अंतर्गत गुन्हा नोंद केला.

या प्रकरणी पोलीस विभाग आरोपींची पाठराखण करीत असल्याचा आरोप फिर्यादीने विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या प्रकरणाची सखोल उच्च स्तरीय चौकशी करून या रॅकेट चा भांडाफोड करण्याची मागणी, तक्रारकर्त्यांनी व नातेवाईकांनी केली आहे. महादेव अ‍ॅप खेळातून मिळणाºया पैशाचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांना आपल्या जाळ्यात फसवणारे आजही तुमसर शहरात बेधडक फिरत आहेत. युवकांना आपले शिकार बनवीत नशेच्या अधीन करून,युवक गुन्हेगारीच्या मार्गांवर असल्याने, विशेष पोलीस महानिरीक्षकांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *