शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या – खा.पडोळे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- भंडारा-गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना सरसकट ५० हजार हेक्टरी मदत जाहिर करण्यात यावी.तसेच शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.शेतकरी व पूरग्रस्त गावाला तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी . पावसामुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांना तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा व पूरग्रस्त गावाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रश- ांत पडोळे यांनी आज संसदेच्या अधिवेशनात केली. यावर्षी झालेल्या २२ जुलै ते आता पर्यंत सतत पडलेल्या निसर्गाच्या पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी शिरून अनेक शेतकºयांचे भात पीक पावसामुळे सडले तर अनेक गावकºयांच्या घरात पाणी शिरले साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खा.पडोळे यांनी कॉंगे्रस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासोबत दोन्ही जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा केला.दौºयामध्ये अनेक शेतकºयांनी आपल्या व्यथा मांडल्या.

यावेळी सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांना खा.डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले होते. पंचनामे करताना कोणत्याही व्यक्तीचे नाव सुटता का कामा नये याची खबरदारी घ्यावी असे निर्देशही खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी अधिकाºयांना दिले. दोन्ही जिल्हाच्या दौºयावर असताना प्रत्यक्ष प्रशासनाचे अधिकारीसह पाहणी केली असता काही अपुर्ण कामामुळे शेतकºयांना फटका बसला असुन अधिकाºयांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे शेतकºयांचे नुकसान झाल्याचे दिसुन आले. खा. प्रशांत पडोळे यांनी सुरू असलेल्या अधिवेशनात हा मुद्दारीतून धरीत गावकºयांना तुटपुंजी पाच हजाराची मदत देण्यापेक्षा शेतकºयांना सरसकट ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *