भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असलेले व समाजाला धोकादायक ठरू पाहणाºया गुंडांना भंडारा पोलीस अधिक्षक यांनी एमपीडीए कायद्यान्वये मध्यवर्ती कारागृह, नागपुर व जिल्हा कारागृह वर्धा येथे रवानगी करण्यात आली. चिराग गजभिये वय २७ वर्षे व लुकेश जोध वय २६ वर्षे दोन्ही रा. आंबेडकर वार्ड गणेशपुर ता. जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत. चिराग नमोद गजभिये व लुकेश उर्फ लुक्का संजय जोध हे दोघेही गुंड प्रवृत्तीची माणसे आहेत.चिराग नमोद गजभिये व लुकेष उर्फ संजय जोध हे सन २०२३ पासुन निर्विघ्न गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्यांचेवर पोलीस ठाणे भंडारा येथे आपल्या साथीदारांसह गैरकायद्याची मंडळी जमवुन खुन, खुनाचा प्रयत्न करणे अश्याप्रकारचे २ गुन्हे दाखल आहेत. त्यांचेमुळे भंडारा शहरातील सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होऊन सुव्यवस्था धोक्यात आली आणि त्यांच्या गुडप्रवृत्तीच्या कृत्यांमुळे शहरात त्यांची प्रचंड दहशत निर्माण केली आहे.
त्यामुळे अशा समाज विघातक व्यक्तीवर वेळीच अंकुश बसविणे गरजेचे होते. त्याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात चिराग नमोद गजभिये व लुकेश उर्फ लुक्का संजय जोध यांचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला. दिनांक ०८ आॅगस्ट रोजी भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आदेशानुसार चिराग नमोद गजभिय यास जिल्हा कारागृह, वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्षनात श्री. नितीनकुमार चिंचोळकर पोलीस निरीक्षक (स्था. गु. शा), भंडारा पोनि.गोकुळ सुर्यवंशी, पोउपनि दीपक चालुरकर, पो. हवा. राजेश पंचबुधे, पो. ना. अंकोश पुराम, पो. अं. योगेश ढबाले, पोना अजय कुकडे, पोना सुनिल राठोड, पो. अं. नरेंद्र झलके यांनी केली.